तायक्वांदोत विद्यार्थ्यांचे आत्मसंरक्षण कौशल्य आणि शिस्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन

मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कूल (मराठी माध्यमिक विभाग), जुहू आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी तालुका तायक्वांदो येलो बेल्ट श्रेणीवाढ परीक्षा दिनांक २ नोव्हेंबर २०२६ ला शाळेत उत्साहात पार पडली.

सब मुंबई तायक्वांदो आणि श्री असीम सोडी व त्यांच्या सहकारी यांच्या समवेत एस. एस. एन. तायक्वांदो अकादमी यांच्या विद्यमाने आयोजित या परीक्षेत विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मसंरक्षण कौशल्य आणि शिस्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व क्रीडा संस्कृती वृद्धिंगत झाली.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ मुंबई रॉयल्स या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना संरक्षक साधने जसे हेड गियर, चेस्ट गार्ड इत्यादी साधने देण्यात येण्याची घोषणा करण्यात आली

याप्रसंगी उपनगर शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष संजीव मंत्री यांनी सुदृढ बना, सशक्त बना, आनंदी रहा असा मोलाचा संदेश दिला. याप्रसंगी पालकांनी देखील आवर्जून उपस्थिती लावून आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आलेख उंचावताना पहिला.