तुळजा परत मिळवणार का सूर्याचा सन्मान ?

मुंबई:’लाखात एक आमचा दादा’ मालिकेत दादाची आई, आशा घराबाहेर राहायला लागते आणि काजू-पुड्या तिच्यासोबत राहतात. दुसऱ्या दिवशी गावकरी सूर्याच्या घरा बाहेर जमा होतात आणि आशाला गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण सूर्या त्यांना इशारा देतो आणि आईचं रक्षण करतो. तर जलिंदर सूर्याच्या बाजूने असल्याचे भासवून गुपचूप लोकांना भडकवतो की सूर्या आणि त्याच्या कुटुंबाचा बहिष्कार करावा. लोक सूर्याच्या दुकानातून सामान घेणे थांबवतात, दूध, वर्तमानपत्र घेणही थांबवतात. सूर्याला आता गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. हे सर्व पाहून आशा गाव सोडण्याचा निर्णय घेते, पण तुळजा तिला थांबवते. तर दुसरीकडे मंजुळा आणि तेजू यांची अचानक भेट होते आणि दोघी चांगल्या मैत्रिणी बनतात. मात्र, दोघीही एकमेकांशी आपली वैयक्तिक माहिती शेअर करत नाहीत. सूर्या ज्यांच्याकडून भाजीपाला आणि इतर माल दुकानासाठी खरेदी असतो त्यांची तिची मुलगी नदीत बुडते. एकही गावकरी तिच्या मदतीस पोहचत नाही, तेव्हा सूर्या स्वतः नदीत उडी मारून त्या मुलीचा जीव वाचवतो. तेव्हा तुळजा सर्व गावकऱ्यांना सांगते की, ज्या व्यक्तीला तुम्ही वाळीत टाकलं होतं, त्यानेच आज या मुलीचा जीव वाचवला आहे.

आता सूर्याच्या या कृत्याने गावकरी सूर्याला परत मान देतील का ? आशा, गाव सोडून जाऊ शकेल ? बघायला विसरू नका ‘लाखात एक आमचा दादा’ दररोज संध्याकाळी ६:३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.