अधूनमधून…
सशक्त नाट्यानुभव…
ALEXANDER VIA DIOGENES
“जीवन काय आहे? स्वतंत्र कोण? पृथ्वीवर सत्य काय? तत्वज्ञान आणि सत्ता एकत्र जाऊ शकतात का? लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य आहे की बहुमताच्या जोरावर प्रजेची, सैन्याची दडपणूक? लोकशाहीत राजा होतो की बनवला जातो..स्वतःचा शोध घेता येतो का…सत्य कळल्यावर काय घडतं? अलेक्झांडर आणि डायोजीनस यांचं सत्य काय?” असे अनेक प्रश्न पडलेत.. जगजेत्या अलेक्झांडर याला…
ग्रीस देशातली गोष्ट. त्यावेळचा एक तत्वज्ञ डायोजीनस, ग्रीसमध्ये अज्ञातवासात राहातोय. अलेक्झांडर त्याचाच शोध घेतोय. एक दिवस अलेक्झांडरचा सेनापती, डायोजीनसला अचानक भेटतो. कुतुहलापोटी तो त्याचा शिष्य व्हायलाही तयार होतो. त्याचवेळी अलेक्झांडरचा सैनिक येतो… म्हाताऱ्या डायोजीनसला न ओळखून, हुसकावून लावायचा प्रयत्न करतो. कारण तिथं अलेक्झांडर येणार असतो, डायोजीनसला भेटायला.. पण सेनापती सैनिकाला हाच डायोजीनस असल्याचं सांगतो. तिथं अलेक्झांडर पोहोचतो… आणि पुढे घडणाऱ्या संवादातून नाट्य घडत जातं…
अलेक्झांडर आणि डायोजीनस यांच्या संवादातून जी चर्चा घडते, ही जरी काहीशी काल्पनिक असली, ग्रीकांची गोष्ट असली तरीही गोष्ट सांगताना लेखकानं खूप तरलतेनं ती मांडलीय. प्रवाही, सुस्पष्ट संवाद कौशल्यानं नाट्य प्रभावी झालंय. अर्थात लेखन, दिग्दर्शन आणि अलेक्झांडर या भूमिका डाॅक्टरांनी लिलया पेलल्यात…अरुण राधायण यांचा डायोजीनस अप्रतिम! संवाद आणि देहबोलीच्या इझमुळे डायोजीनस साक्षात पाह्यला मिळतो. विनय कांबळे यांच्या सेनापतीचा अंदाजही वाखाणण्याजोगा.
अलेक्झांडर (डाॅ.सोमनाथ सोनवलकर) डायोजीनस (अरुण राधायण) सेनापती (विनय कांबळे) यांच्या सहज अभिनयानं भूमिकेचे कंगोरे अधिक स्पष्ट झालेत…
अशा गोष्टीसाठी सूचक नेपथ्य रचना (अरुण राधायण), नेपथ्य निर्माण(सचिन गोताड), प्रकाशयोजना(श्याम चव्हाण) आणि उत्कंठावर्धक पार्श्वसंगीत (महेंद्र मांजरेकर) यामुळेच नाट्य प्रभावित झालंय. विशेष कौतुकास्पद कामगिरी म्हणजे रंगभूषाकार उलेश खंदारे आणि वेशभूषाकार ग्रेगरी फर्नाडिस यांची….
हा सशक्त नाट्य-दीर्घांक सादर केला होता…
“माणूस फाऊंडेशननं”
ALEXANDER VIA DIOGENES
उमेश घळसासी
9819595521