सखी सावित्री व विद्यार्थी सुरक्षा अंतर्गत स्वसंरक्षण कार्यशाळा

मुंबई:रोटरी क्लब ऑफ बॉम्बे जुहू बीचच्या अध्यक्षा रोटे, लता देसाई व सहकारी रोटे, किशोरी बेन यांच्या सहकार्याने विद्यानिधी मराठी माध्यम मध्ये ५वी-६वीच्या १०० विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा दिनांक ९ सप्टेंबर २०२६ ला घेण्यात आली.

५ डॅन ब्लॅक बेल्ट (5th Dan Black Belt), १० वेळा नॅशनल चॅम्पियन व मंगोलियातील आशियाई सुवर्णपदक विजेत्या व आता कझाकिस्तान वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झालेल्या राष्ट्रीय प्रशिक्षक नीरल त्रिवेदी यांनी आत्मविश्वास व सोप्या स्वसंरक्षण टिप्सचे मार्गदर्शन केले. हा उपक्रम सखी सावित्रीच्या सशक्तीकरणाचा खरा संदेश देणारा ठरला.