शाळा मराठी माझी…विद्यानिधी शाळा मराठी !

मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कुल मराठी माध्यम. ही शाळा… जुहूसारख्या प्रतीथ यश वस्तीमध्ये वंचितांसाठी शिक्षणं मराठी माध्यमातून देण्यासाठी. सामान्यांना असामान्य बनविणारी शाळा या ध्येय वाक्याशी वचनबद्ध आहे.यासाठी शाळेचे खंबीर संचालक मंडळ, विद्यार्थी वर्गासाठी मनापासून काम करणारे शिक्षक. शिक्षकेतर ,जिज्ञासू विद्यार्थी आणि मराठी शाळांवर विश्वास ठेवण्यारे पालक हे सर्वच कौतुकास पात्र आहेत, याचाच परिणाम म्हणून शिक्षक साहित्य… सौ पिंगळे जिल्ह्य़ात प्रथम राज्य स्तरासाठी निवड. लोकनृत्य विभाग स्तर द्वितीय, समूहगान विभाग स्तर द्वितीय,विज्ञान प्रकल्प तालुका स्तर लहान गट प्रथम, विद्यार्थी वकृत्व. तालुका स्तर लहान गट प्रथम, विज्ञान प्रकल्प तालुका स्तर मोठा गट द्वितीय, एकपात्री अभिनय तालुका स्तर तृतीय,शिक्षक वकृत्व तालुका स्तर तृतीय आणि या सर्वांचे फलित.

बृहन्मुंबई शिक्षण विभाग जिल्हास्तर सर्वोत्कृष्ट शाळा तृतीय क्रमांक मिळाला आहे. तसेच यावर्षी या शाळेचा शाळेची विज्ञान प्रतिकृती हायड्रो हिरोज वॉटर सेवियर ही अगस्त्या फाउंडेशन व प्रल्कक्षा युनिव्हर्सिटी यांच्या व्यासपीठावर राष्ट्रीय स्तरासाठी निवडली गेली आहे.

सर्व पारितोषिके गॅरेजपासून सुरवात करणारे, असामान्य सकारात्मक इच्छाशक्ती असणारे, वंचितांसाठी शिक्षणा ची सुविधा निर्माण करणारे कै.श्रीराम मंत्री सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना समर्पित केली आहेत.