‘विद्यानिधी’त शिवजयंतीनिमित्त परिपाठाचे आयोजन!

मुंबई: शिवजयंतीनिमित्त जुहू येथे विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कूलमध्ये परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन शाळेच्या ६ वीच्या विद्यार्थ्यांनी केले. मुख्य अतिथी म्हणून उपनगर शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळ सदस्या डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्त्रीसन्मान याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. डॉ. कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालण्याचे आवाहन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पोवाडा, पुस्तक समीक्षा, नृत्य आणि संगीत सादर केले. सर्व ६ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने समारंभ यशस्वी केला. शिवरायांच्या जीवनाचे स्मरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. सर्व अतिथी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.