शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बाल भवनच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘विद्यानिधी’च्या विद्यार्थ्यांना लोकनृत्याचा मान!

मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत लोकनृत्य स्पर्धेत विभाग स्तरावर विद्यानिधी विद्यालयाचा प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या लहान गट आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना बाल भवनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त सादरीकरणाची संधी मिळाली. त्याला शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली.

एखादी कलाकृती जेव्हा जन्माला येते, तेव्हा नियती तिचे नशीब लिहीत असते, परंतु काही कलाकृती या स्वतःहून स्वतःचे नशीब घेऊन येतात आणि नियतीला ते मान्य करायला लावतात. स्वर्गीय श्रीराम मंत्री यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वंचितांचे शिक्षण हा वसा घेऊन निर्माण झालेल्या सामान्यांना असामान्य बनविणाऱ्या विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागाच्या डोंग सेरेंग संथाल आदिवासी लोकनृत्य या कलाकृती बाबत देखील तेच म्हणता येईल. बालभवन येथे सादरीकरण करताना शिक्षण मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल आणि मुंबई शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांच्या उपस्थितीत सादरीकरणाची संधी मिळाली.

यासाठी नृत्यदिग्दर्शक बसुराज, मार्गदर्शिक शिक्षक सीमा पाटील. सुश्मीता पाटील व विद्यानिधीच्या बाल नर्तिका सर्वांचे कौतुक करण्यात येत आहे.