जागतिक बालरंगभूमी दिनी ‘गुरुस्कूल गुफान’मध्ये प्रा.देवदत्त पाठक यांच्या नाट्य कार्यशाळेतून आणि डुंगु आणि पुंगू या नाटकाद्वारे साजरा

पुणे: एक तर मुलांना नाट्यगृहाकडे न्या किंवा घरामध्येच नाट्य कला मुलांसाठी मुलांच्या रंजन व प्रबोधन , विकसनासाठी निर्माण करा…असे प्रा. देवदत्त पाठक यांनी सांगितले. त्यासाठी नाट्यकलेला घराघरात पोहोचवणारे रंगमंचीय खेळ हे साधन सर्व पालक, शिक्षक आणि मुलांनी घरात, शाळेत, सार्वजनिक ठिकाणी उपयोगात आणायला हवे, असे विचार जेष्ठ रंगभूमी कला तज्ञ प्रा.देवदत्त पाठक यांनी जागतिक बालरंगभूमी दिनानिमित्त नाट्य कार्यशाळा आणि नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने मांडले .

नाट्यकला धारिष्ट देतेच, पण ती जर का शालेय जीवनात चुकीच्या पद्धतीने रुजू झाली तर त्याचा त्याची एक वेगळी भीती सुद्धा बसू शकते त्याचा परिणाम वागण्या बोलण्यात दिसू शकतो ,यासाठी शिक्षक आणि पालक यांनी काळजीपूर्वक रंगभूमी कलेचा वापर करायला हवा . कला शिक्षक मिलिंद केळकर यांनी मांडले. डुंगु आणि पुंगू या बालनाट्याचा प्रयोग या निमित्ताने अर्णव देशपांडे आणि मल्हार बनसोडे यांनी सादर केला. लेखन, दिग्दर्शन देवदत्त पाठक यांचे तर प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन मिलिंद केळकर यांचे होते .

बाल, कुमार, किशोर आणि प्रौढता या चार फेजेस मध्ये माणूस जगत असला तरीही दोस्तीचे चे नाते कसे घट्टच राहते याबद्दल रंजक अनुभव देणारे हे नाटक विचारही करायला लावते. उषा देशपांडे ,ऋतुजा केळकर ,गौरी बनसुडे ,धनश्री गवस , दर्शन पोळ यांनी या प्रयोग निर्मितीसाठी सहकार्य केले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अनिता मोहिते (संचालक भारती विद्यापीठ) डॉ. कल्पना हबाडे (संचालक टाटा पावर) उपस्थित होत्या.

सध्या शाळांमध्ये परीक्षांचे वातावरण असले ,तरीही गुरु स्कूल गुफान या संस्थेने नाट्य प्रयोग आणि नाट्य कार्यशाळेचे आयोजन करून जागतिक बाल रंगभूमी दिन समर्पक पद्धतीने सादर केला. ASSITEJ या इंटरनॅशनल थेटर कंपनीद्वारे जागतिक बालरंगभूमी दिन सर्व जगात ९२ देशात साजरा केला जातो,

मुलांनी ऐकावं ,पहावं संवेदित व्हावं, विचार व कल्पना करून आपले मत आणि कलात्मक रूप सादर करावे, यासाठी जागतिक बाल रंगभूमी दिनाची मदत होते,असे मत प्रा डॉ.अनिता मोहिते आणि डॉ. कल्पना हबाडे यांनी यावेळी व्यक्त केले .