मुंबई: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र आणि लीडरशिप फॉर इक्विटी (LEF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय हॅकथॉन स्पर्धेत जुहूच्या विद्यानिधी व्ही. पी.हायस्कूल, जुहूच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढवला. या उपक्रमात ३९ जिल्ह्यांतील १,४७७ शाळांमधून ४८,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हास्तरावरून निवड झालेल्या प्रकल्पांमधून राज्यस्तरासाठी अंतिम निवड करण्यात आली.
सिद्धेश महेश भोसले (इयत्ता ८ वी) तनिष मंगेश भडवळकर ( इयत्ता ७वी), प्रविण बाबू खोंदल (इयत्ता ७वी), या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षिका अनुजा थोरात यांच्या मार्गदर्शना अंतर्गत समाजोपयोगी, पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून संस्थापक स्व. श्रीराम मंत्री यांच्या “वंचित विद्यार्थ्यांना सुजाण, समृद्ध नागरिक घडवायचे” या ध्येयाला साजेशी कामगिरी केली.