मुंबई: मुंबई उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कूल मराठी माध्यमिक विभागातर्फे २३ ते २९ एप्रिल दरम्यान ‘कलाविष्कार’ उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. इनर व्हिल क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तियारा (Inner Wheel Club of Bombay Airport Tiyara) यांच्या अध्यक्षा सोनल पारेख व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात २२८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मल्लखांब, तायक्वांदो, स्केटिंग, लाठीकाठी, लिप्पन आर्ट, गायन, इंग्लिश संभाषण, संगणक अशा १२ विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
सामान्य ते असामान्य (Ordinary to Extraordinary) या ध्येयवाक्याखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. शिबिराच्या अंतिम समारोपप्रसंगी (Grand Finale) विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षकांचा सत्कार व सर्वोत्कृष्ट सादरकर्ता (Star Performer) विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण झाले. प्रायोजक इनर व्हिल क्लब (Inner Wheel Club) भोजन व बक्षिसांचे प्रायोजक होते.
पर्यवेक्षक क.पाटेकर व प्रभारी मुख्याध्यापक प्रशांत पाटील निवेदिका मनीषा बांगर व वैशाली गोळे यांनी शिबिराचा उद्देश व यशस्वीतेमागील टीमचे योगदान मांडले. व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष संजीव मंत्री, सचिव डॉ. साधना मोड व सदस्य डॉ.कीर्तीदा मेहता यांनी उपस्थिती लावून मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे सांगितले. शिबिरामुळे वंचित घटकातील मुलांना नव्या संधी व व्यासपीठ मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.