मुंबई:विद्यानिधी कमला रहेजा कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय व विद्यानिधी व्र .प्र. मराठी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी विलेपार्लेचा राजासारख्या सार्वजनिक गणेश मंडळासमोर अमली पदार्थ विरोधी पथनाट्य सादर केले. शिक्षिका संगीता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला. शाळा-महाविद्यालयातील शिक्षक नागेश सर,शिक्षिका बांगर मॅडम,शिक्षिका नीलिमा मॅडम या इतर सहशिक्षकांच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमाचे गणेश भक्त व नागरिकांनी कौतुक केले.