हरवलेल्या प्रेमाची गोष्ट… “लोच्या कॉपीचा”

मुंबई:लोच्या कॉपीचा, असे शीर्षक वाचले की कॉपी प्रकरण आणि त्यासाठी करावा लागणाऱ्या भानगडी, असे काहीसे कथानक आपल्या समोर येईल. मात्र धक्कादायक वळणे घेत अभ्यासाच्या हरवलेल्या हरवलेल्या प्रेमाची गोष्ट रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल.

ब्ल्यू हेवन एंटरटेन्मेंट निर्मित आणि परशुराम शिंदे प्रस्तुत लोच्या कॉपीचा चित्रपट येत्या शुक्रवारी १६ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे. विजय, नागेश, मीनू, ओंकार आणि प्रिया अशा प्रमुख पाच कलाकारांबरोबर इतर कलाकार असणाऱ्या या चित्रपटात कॉपी या विषयाला अनुसरून कथानक रसिकांना नक्कीच विचार करायला लावेल. वरील पाच जण एका गावात शाळेत शिकताना पास होण्यासाठी कॉपीचा आधार कसा घेतात आणि कथानक कसे वळण घेते, यासाठी चित्रपट पाहायला हवा. कॉपी करणे जसे चुकीचे आहे, त्याप्रमाणे पालकांच्या अवास्तव अपेक्षेमुळे आजची मुले कोणते टोकाचे पाऊल उचलू शकतात, असे पडद्यावर कथानक पाहताना मायबाप प्रेक्षक स्वतःला हरवून जाईल.

चित्रपटात प्रवीण भाबल, नवीन कदम, ओंकार कांबळी, चैताली राऊत आणि श्रद्धा कट्टीमणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्माता अमित अशोक काकडे, तर कार्यकारी निर्माता स्वप्नील अनंत पवार (नाना) आहेत. दिग्दर्शक अक्षय सुतार, संगीत दिग्दर्शक मितेश चिंदरकर,विनय शिर्के, गीते श्वेता बसनाक पाटील,विनय शिर्के, संकलन श्वेता बसनाक पाटील यांचे आहे तर संगीत झी म्युझिक कंपनीचे आहे.