विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर: रत्नपुर तालुक्यातील बाजार सावंगी येथे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा शेतकऱ्यांशी संवाद साधला. स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक बाबींवर चर्चा केली. अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना केल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख कृष्णा डोणगांवकर,तालुकाप्रमुख राजू वरकड,विधानसभा संघटक गणेश अधाने,उपतालुका प्रमुख कृष्णा घुले, विभाग प्रमुख विजय चव्हाण, उपविभाग प्रमुख बाळू खुटे,सरपंच आप्पासाहेब नलावडे,उपसरपंच कारभारी नलावडे,अविराज निंकम,कल्याण नलावडे, शाखाप्रमुख अमोल दहातोंडे, योगेश गायकवाड,अशोक नलावडे, विशाल घुले,अंकुश नलावडे आणि संदिप गायकवाड उपस्थित होते.