सिल्वोस्टाईलतर्फे डिजिटल जनरेशनसाठी अवांत-गार्ड ब्रँड मोहीम

मुंबई:सिल्वोस्टाईलने नवीन पिढी (जेन झी) व मिलेनियल्ससाठी राशा थडानी यांचा समावेश असलेली ब्रँड मोहीम सुरू केली आहे. मोहिमेचा मुख्य संदेश, “ब्रिन्ग आऊट द बेस्ट इन यु ” हा आहे. सिल्वोस्टाईल ज्वेलरी केवळ ॲक्सेसरीज म्हणून नव्हे, तर अभिजातता,आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाला महत्व देते हे या  ब्रँड मोहिमेतून अधोरेखित करण्यात येत आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये झलक सादर केली जाईल.ॲडविन्सी कोडच्या सहकार्याने विकसित केलेली ही मोहीम सिल्वोस्टाईलची झिलेनियल्ससोबत असलेली वचनबद्धता अधोरेखित करते.  

सिल्वोस्टाईलच्या विपणन, ई – कॉमर्स व सीएसआर विभागाचे उपाध्यक्ष हेमंत चव्हाण म्हणाले की, तरुणांमध्ये ज्वेलरी क्षेत्रातील नवीन कल पाहणे खूप आनंददायक बाब आहे. प्रत्येक दागिना हा स्त्रीचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व वाढवण्यास मदत करू शकतो. राशाच्या आमच्या सहयोगाअंतर्गत  टीवीसी सादर होण्यापूर्वी उत्साह निर्माण करण्यासाठी इंस्टाग्राम टीझरचा समावेश आहे.

ॲडविन्सी कोडचे क्रिएटिव्ह हेड म्हणाले की, एक युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी राशा ही ज्वेलरी क्षेत्रातील  एक नवीन चेहरा असल्याने, आमच्या मोहिमेचे नवीन पिढीशी असणारे नाते दृढ करते. या टीव्हीसीसाठी काम करताना खूप आनंद झाला आणि ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही आनंदित झालो.

ही मोहीम आत्म-अभिव्यक्ती आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्व साजरे करण्याबरोबरच प्रत्येक स्त्रीमधील व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास दर्शविते.अभिजातता आणि शैलीबरोबरच राशा थडानीच्या मुक्त-उत्साही स्वभाव आणि तिने परिधान केलेले  उत्कृष्ट दागिने हे या फिल्ममध्ये दाखविले गेले आहे. सिल्वोस्टाईल सीझेड स्टर्लिंग ज्वेलरी विविध समारंभ, कार्यक्रमामध्ये कशी परिधान  करता येईल हे या टीव्हीसीमधून पाहायला मिळणार आहे.