हसता हसता शहाणे करणारे प्रबोधनात्मक नाट्य ‘बबड्या बोल की…’

पुणे: गुरुकुल गुफान संस्थेचे डोळ्यात अंजन घालणारे मनोरंजक नाटक. नेट ,मोबाईल, व्हिडिओ गेम्स,च्या आजच्या गतिमान युगात मुलं आपल्या कुटुंबापासून अलिप्त एकटे होत आहेत, प्रसंगी अतिरेकीसुद्धा होत आहेत,पालक आपल्या कामानिमित्त सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत गुंतलेले असतात, अशा वेळेला मुलांचा पालक मालक,आणि नियंत्रक हा त्याचा मोबाईल, गेम व्हिडिओ गेम होताना दिसत आहे .

मुलांपासून त्यांच्या प्रश्नांपासून त्यांच्या अडचणीपासून आणि विशेष करून त्यांच्या दंग्यापासून लांब ठेवण्यासाठी पालक नकळत मुलांच्या हातात दिलेलं राक्षसी अस्त्र हत्यार म्हणजे मोबाईल, काही क्षणातच सगळं जग आपल्यासमोर उघड होत असताना मुलं मात्र त्या कृत्रिम (आर्टिफिशियल) जगात इतकी रमून जातात ते कृत्रिम जग जेव्हा मोबाईलच्या रूपात नसेल, तेव्हा ती आतताई अतिरेकी हिस्त्र राक्षसी सुद्धा होऊ शकतात ,अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आजूबाजूच्या घटनांमधून ऐकायला आणि पाहायला मिळतो, अशाच पालकांपासून लांब गेलेल्या एका बबड्याचं किंवा पालकांनीच लांब ठेवलेल्या बबड्याचं हे नाटक आहे, ‘बबड्या बोल की… ‘

ताणतणाव, मनोरंजकता , आजूबाजूची माणसं यांच्या वागण्यातून झालेला परिणाम यावर केलेली मर्मभेदक टिप्पणी या नाटकाचे बलस्थान आहे. सध्या आईबाबाच मुलाला लहान लांब का ठेवतात.मुलाला घरातली कामवाली मोलकरीणसुद्धा त्याच्यापासून लांब का राहते, मैत्री का तुटते का ? आणि स्वतःची बहीण भावाचं नातं सुद्धा का बिघडते ? याचा एक रोचक अनुभव प्रेक्षकांना बघायला मिळतो, हे त्यातून बाहेर पडण्यासाठी या नाटकात त्याची आजी ही तर संपूर्ण त्या मुलाचं आयुष्य परत पूर्वपदावरती रंजक पद्धतीनेआपल्या पद्धतीने करते. पराकोटीचा प्रयत्न करत राहते प्रा. देवदत्त पाठक लिखित आणि दिग्दर्शित आणि मिलिंद केळकर यांच्या सहाय्यक दिग्दर्शनातून हे नाटक नेटकेपणाने उभे राहिले आहे ,यामध्ये नेपथ्य, प्रकाश, आणि संगीत याची जबाबदारी मुलांनी त्यांच्या कल्पननेतून या नाटकाला बेलली आहे याची वेशभूषा रंगभूषा सुद्धा मुलं स्वतःच करतात, संगीत आणि प्रकाश योजना सुद्धाच हाताळतात, याचे नाट्यप्रयोग अतिशय नेटक्या जागेत हे नाटक, प्रेक्षागृहात, शाळांमध्ये आणि प्रामुख्याने घरात होत आहे . अशा लक्षवेधी नाटकांमध्ये अर्णव देशपांडे, अलोक जोगदंडकर, धनश्री गवस अक्षता जोगदंनकर, आर्या करपे, सायली चव्हाण, अंजली चव्हाण यांनी यांच्यासह देवदत्त पाठकसुद्धा एका वेगळ्या भूमिकेत दिसतात. आपल्याला हे नाटक जो संदेश देते तोच संदेश नुसतं मनोरंजन म्हणून डोक्यात न ठेवता आपल्या थेट घरात घेऊन जायला काही हरकत नाही, असा या नाटकाचा आश्वासक अनुभव आहे, गुरुस्कूल गुफानच्या या नाट्यप्रयोगासाठी उषा देशपांडे, ऋतुजा केळकर, दर्शन पोळ आणि सर्व पालकांचे सहकार्य लाभले आहे. मुलांच्या अति प्रश्नांमुळे त्रस्त होण्यापेक्षा मुलांच्या प्रश्नांची घरामध्येच वर्ग शाळा भरावा, नाहीतर गालावरती कायमचे अश्रू येतील , हे टाळण्यासाठी हे नाटक प्रत्यक्ष प्रेक्षागृहात जाऊन बघण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा. देवदत्त पाठक सादर करीत आहेत ‘बबड्या बोलकी’

गुरुस्कूल गुफानची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन आणि सबकुछ प्रा. देवदत्त पाठक, प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक मिलिंद केळकर, सूत्रधार उषा देशपांडे, ऋतुजा केळकर ,अलोक जोगदनकर, कलाकार अर्णव देशपांडे, अक्षता जोगदनकर , सायली चव्हाण, अंजली चव्हाण , धनश्री गवस, आर्या करपे, आलोक जोगदंनकर, तंत्र सहाय्य दर्शन पोळ, नेहा स्टुडिओ, रंगभूषा ऋचा कुंभारे, वेशभूषा धनश्री अक्षता आदी आहेत.