देव मानण्यात कर्मठपणा नको तर लवचिकता हवी… “देवा रे देवा”

पुणे:देव मानण्यात कर्मठपणा नको तर लवचिकता हवी. ‘देवा रे देवा’ गुडी शि एम निर्मितीचा नवीन लघुपट (शॉर्ट फिल्म) दसऱ्याला प्रदर्शित झाला. देव मनापासून मानणारे ,देव न मानणारे आणि देव मानावा किंवा मानावा या संभ्रमात असणारे अशा तीन विचारधारांच्या बाबतीत संघर्षमय नाट्य सादर करणारी प्रमुख तीन महिला व्यक्तिरेखांभोवती फिरणारी आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची एक अत्यंत विचारांना प्रभावित करणारा लघुपट आहे.

प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी याची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. मिलिंद केळकर यांनी प्रमुख दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपली जबाबदारी सांभाळलेली आहे. यामध्ये दीपिका देवदत्त या उषाताई तर धनश्री गवस ही देविका आणि अक्षता जोगदनकर ही मजा या प्रमुख भूमिकेत आहेत. पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या दोन मुली उषाताईंच्या अति करमठणामुळे वैतागून जातात आणि त्यांना सोडून जाण्याचा विचार करतात, त्यावेळेला उषाताई यांना आपल्यामध्ये असलेला अति कर्मठपणा हा दुसऱ्याला किती त्रासदायक ठरू शकतो, याची जाणीव करून देतो. देवाबाबत असलेला त्यांचा अंधश्रद्धाळू दृष्टिकोन बदलण्याच्या मनस्थितीत राहतात ,पुढे काय घडते बघणे अत्यंत रोचक आहे. गु डी शि एम ची ही लघुचित्र निर्मिती विचारांना तेज करणारी आहे.

आजच्या धकाधकीच्या काळात देव आणि त्याचे देव देवकर्म करणे यापेक्षा श्रद्धेने आपले कर्म करणे आणि त्यापेक्षा नात्यांना मनापासून जपण्याचे कर्म करणे, असे समजवणारी उत्कृष्ट विषय आणि गोष्ट असलेली ही लघुचित्र निर्मिती सर्वांनी बघण्यासारखी आहे, तर जरूर बघा आणि या निर्मितीच्या निमित्ताने आपण आजच्या काळात देव या संकल्पनेबद्दल काय विचार घेऊन जगणे गरजेचे आहे, हे जाणून घ्या.

देवा रे देवा

गुरु शिष्य क्रिएशन अर्थात ‘गुडीशिएम’ची निर्मिती
लेखक, कथा, पटकथा, संवाद आणि संगीत: देवदत्त पाठक
दिग्दर्शक:देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर
कलाकार:दीपिका देवदत्त, धनश्री गवस, अक्षता जोगदनकर, साजिरी नगरकर
छायाचित्रण:आनंद पवार
संकलन:आकाश भुतकर