मुंबई : बहुप्रतिक्षित असुस आरओजी फोन ७ सिरीज आता खरेदीसाठी प्रत्यक्ष विजय सेल्स स्टोअर्समध्ये आणि त्यांची ईकॉमर्स वेबसाइट विजयसेल्सडॉटकॉमवर उपलब्ध आहे. एप्रिलमध्ये सुरूवातीला विजय सेल्स या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल साखळीने यापूर्वीच्या आरओजी फोन ६ सिरीजच्या लाँचदरम्यान अत्यंत यशस्वी सहयोगानंतर भारतात आरओजी फोन ७ आणि आरओजी फोन ७ अल्टिमेट फ्लॅगशिप गेमिंग स्मार्टफोन्सच्या लाँचसाठी असुससोबत प्रीफर्ड रिटेल सहयोग केला.
विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता म्हणाले, ‘आम्हाला विजय सेल्स स्टोअर्समध्ये आणि आमच्या ईकॉमर्स वेबसाइटवर असुस आरओजी फोन ७ सिरीजच्या बहुप्रतिक्षित लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. आम्ही ग्राहकांना बाजारपेठेतील आधुनिक आणि सर्वात प्रगत तंत्रज्ञान प्रदान करण्याप्रती कटिबद्ध आहोत. असुस आरओजी फोन ७ सिरीजमधून अस्सल नवोन्मेष्कार दिसून येतो, जो गेमिंगप्रेमींना शक्तिशाली कार्यक्षमता आणि सर्वोत्तम वैशिष्ट्यांच्या माध्यमातून अद्वितीय गेमिंग अनुभव देतो.’
७४,९९९/- रूपये किंमत असलेला आरओजी फोन ७ १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन फॅन्टम ब्लॅक आणि स्टॉर्म व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच, आरओजी फोन ७ अल्टिमेट १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह येतो, ज्यामध्ये मागील बाजूस आरओजी व्हिजन पीएमओएलईडी डिस्प्ले आहे आणि स्टॉर्म व्हाइट कलर व्हेरिएण्टमध्ये उपलब्ध असून याची किंमत ९९,९९९/- रूपये आहे.
आरओजी फोन ७ सिरीज सूक्ष्मदर्शी गेमिंगप्रेमींना सर्वोत्तम फ्लॅगशिप गेमिंग आणि स्मार्टफोन अनुभव देण्याची खात्री देते. ही सिरीज आधुनिक ३.२ गिगाहर्टझ स्नॅपड्रॅगन® ८ जेन २ मोबाइल व्यासपीठ आणि अद्वितीय कार्यक्षमतेसाठी अत्याधुनिक गेमकूल ७ कूलिंग सिस्टमसह नो-कॉम्प्रोमाइज कार्यक्षमता देते. अपग्रेडेड थर्मल डिझाइन दीर्घकाळापर्यंत वापरानंतर देखील डिवाईसेसना अत्यंत थंड ठेवते. तसेच ऐरोअॅक्टिव्ह कूलर ७ पोर्टेबल २.१ साऊंड सिस्टमला सबवूफरप्रमाणे दुप्पट कार्यक्षम करतो.
डिवाईसेसमध्ये ६.७८ इंच एएमओएलईडी एचडीआर१०+ डिस्प्लेसह सर्वोत्तम १६५ हर्टझ रिफ्रेश रेट, जवळपास ७२० हर्टझचा गतीशील टच सॅम्प्लिंग रेट, २३ एमएसची जलद टच लेटन्सी आणि जवळपास १५०० नीट्सचा सर्वोच्च ब्राइटनेस आहे. ही सर्व वैशिष्ट्ये उल्लेखनीय गेमिंग अनुभव देतात. गेमिंग स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल सोनी आयएमएक्स७६६ फ्लॅगशिप रिअर कॅमेरासह उच्च दर्जाची लो-लाइट कार्यक्षमता, ८के रेकॉर्डिंग, व्हिडिओजसाठी ईआयएस व एचडीआर१०, तसेच ईआयएस आणि फोटोंसह उच्च दर्जाचा ४के देणारा ३२ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा आहे.
सिरीज ५१२ जीबी यूएफएस ४.० स्टोरेज आणि जवळपास १६ जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम देते. आर्मरी क्रॅट गेम कंट्रोल-सेंटरसह गेमिंग स्मार्टफोनमध्ये कंसोल-सारखा गेमिंग अनुभव, एअरट्रिगर अल्ट्रासोनिक ट्रिगर बटन्स आणि अद्वितीय गेम कंट्रोलसाठी १० मोशन कंट्रोल गेस्चर्स आहेत.