कर्करोगाशी लढा देत आर्यन रहाटेने दहावीत मिळवले ९६ टक्के !

मुंबई : आयसीएसी बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेचा आर्यन अभिजीत रहाटे या विद्यार्थ्यांनी रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत दहावीचा परीक्षेत ९६.५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. विलेपार्ले येथे राहणारा आर्यन रहाटे याला गतवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ताप आला तपासणीनंतर त्याला रक्ताचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आजारामुळे रक्तातील पांढऱ्या पेशीवर परिणाम होत होता. या सर्व आजारांची लढा देत असताना देखील मोठ्या जिद्दीने दहावीची परीक्षा दिली, परीक्षेचा निर्णय घेतला आजारामुळे नियम त्याला शाळेत जाता येत नव्हते. शाळेच्या प्रशासनाने देखील त्याला खूप मदत केली. त्यांनी प्रश्नपत्रिका ३ सांताक्रुझ येथील सूर्या रुग्णालयातून दिले. त्याच्या घरी जाऊन विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी त्याचा सत्कार आणि लवकर तब्येत सुधारली पाहिजे यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आर्यन लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना केली. संपूर्ण विलेपार्ल्यात आर्यनची जिद्द आणि चिकाटीचे कौतुक होत आहे.