‘चेक’चा अ‍ॅक्सिस बँकेसोबत सहयोग

मुंबई : बेंगळुरू-स्थित फिनटेक स्टार्टअप चेकने (www.cheq.one) वापरकर्त्यांसाठी क्रेडिट कार्ड बिल पेमेंट अनुभव अधिक लाभदायी करण्यासाठी भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रीय बँक अ‍ॅक्सिस बँकेसोबत सहयोग केला आहे. या अद्वितीय सहयोगाचा भाग म्हणून चेक अ‍ॅपवर त्यांचे अ‍ॅक्सिस क्रेडिट कार्ड बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या पेमेंटच्या १.५ टक्के रक्कम चेक चिप्सच्या रूपात मिळेल. सामान्यत: वापरकर्त्यांना नियमित मिळणाऱ्या १ टक्क्यांपेक्षा अतिरिक्त ०.५ टक्के इंसेन्टिव्ह आहे.

चेक चिप्स हे अ‍ॅपचे इन-अ‍ॅप चलन आहे, जे चेकवरील प्रत्येक पेमेंटसाठी रिवॉर्ड म्हणून मिळते. ते अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमॅटो अशा अव्वल ब्रॅण्ड्सकडून वाऊचर्ससाठी रिडिम करता येऊ शकतात किंवा रोख रक्कमेमध्ये बदलून बँकेमध्ये भरता येऊ शकतात. चेक अ‍ॅपवर १०० रूपयांच्या किमान बिल पेमेंटवर फक्त अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी ही ऑफर लागू होईल.

चेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य सोनी म्हणाले, ‘आम्हाला अ‍ॅक्सिस बँकेसोबत त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड बिलांची वेळेवर परतफेड करण्यासोबत पुरस्कृत करण्याचा आनंद होत आहे. चेक चिप्सना समुदायाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला आशा आहे की, अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डधारकांसाठी हे अतिरिक्त इंसेन्टिव्ह आम्हाला प्रत्येक भारतीयाला क्रेडिट समजून घेण्यास, व्यवस्थापित करण्यास आणि त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार लाभ घेण्यास मदत करण्याच्या आमच्या ध्येयामध्ये मदत करेल.’

अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्ड्स अ‍ॅण्ड पेमेंट्सचे अध्यक्ष आणि प्रमुख संजीव मोघे यांनी सांगितले, ‘अ‍ॅक्सिस बँकेमध्ये आमचा आमच्या सर्व प्रयत्नांमध्ये ग्राहकांना प्राधान्य देण्यावर, तसेच इकोसिस्टममधील सर्व भागधारकांसाठी समान मूल्य निर्माण करण्यावर विश्वास आहे. या प्रयत्नामध्ये आम्हाला क्रेडिट कार्ड बिलांच्या वेळेवर रिपेमेंटसाठी इंसेन्टिव्ह देण्याकरिता चेकसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की, अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डधारकांसाठी अतिरिक्त चेक चिप्सचा रिवॉर्ड भारतभरातील आमच्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल, जेथे त्यांचा क्रेडिट प्रवास पूर्वीपेक्षा अधिक शिस्तबद्ध आणि रिवॉर्डिंग होईल.’