जम्प.ट्रेडचा कॉईनस्विचसह सहयोग

डिजिटल लॅण्ड्ससह मेटाव्हर्स-केंद्रित जाहिरातीसाठी आले एकत्र

मुंबई : ३६० डिग्री डिजिटल कलेक्टिबल तंत्रज्ञान सक्षम व्यासपीठ गार्डियनलिंकच्या प्रमुख एनएफटी बाजारस्थळ जम्प.ट्रेडने कॉईनस्विच या भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो गुंतवणूक व्यासपीठासोबत सहयोगाची घोषणा केली. जम्प.ट्रेडचा आगामी गेम रॅडडीएक्स रेसिंग मेटाव्हर्समधील वेब३ क्षेत्रात जाहिरात करण्यासाठी ब्रॅण्ड्सकरिता अद्वितीय तत्त्वाच्या माध्यमातून कॉईनस्विचने हा सहयोग केला आहे.

जम्प.ट्रेडने या वर्षाच्या सुरूवातीला त्यांचा पहिला रेसिंग गेम रॅडडीएक्स रेसिंग मेटाव्हर्सच्या लॉन्चची घोषणा केली आणि रॅडडीएक्स मेटाव्हर्स एनएफटीच्या प्री-बुकिंगला भव्य यश मिळाले आहे. या गेम मेटाव्हर्सने ब्रॅण्ड्स आणि व्यक्तींसाठी गेममधील व्हर्च्युअल रिअल इस्टेट घटक खरेदी करण्याची संधी देखील खुली केली. हे घटक जाहिरात, इव्हेण्ट-होस्टिंग यांसारख्या व्यावसायिक उद्देशांसाठी वापरता येऊ शकतात.

फ्लिपकार्ट आणि थॉटवर्क्स यांसारख्या ब्रॅण्ड्सनी रॅडडीएक्स रेसिंग मेटाव्हर्समधील डिजिटल लॅण्ड्स एनएफटी खरेदी करण्याप्रती त्यांची रूची व्यक्त केली आहे. या टप्प्यावर कॉईनस्विचने जम्प.ट्रेडसोबत सहयोग केला आहे. हा सहयोग भारतातील वेब३ नवोन्मेष्काराचा सक्षमकर्ता असण्याचा कॉईनस्विचच्या प्रयत्नांशी संलग्न आहे.

जम्प.ट्रेडचे सीओओ कामेश्वरन एलानगोवन म्ह्णाले, ‘कॉईनस्विचद्वारे डिजिटल लॅण्ड्सच्या खरेदीमधून विशेषत: उपखंडामधील क्रिप्टो ब्रॅण्ड्स त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी एनएफटी/ वेब३ क्षेत्रात करत असलेला प्रवेश दिसून येतो. हे क्रिप्टो आणि एनएफटी ब्रॅण्ड्स सहयोगाने भारतात वेब३चा अवलंब आणि प्रवेशाकरिता मदत करू शकतात, याचा स्पष्ट संकेत दिसून येतो.’