इझमायट्रिपचा कॅप्री ग्लोबल होल्डिंग्जसह करार

मुंबई : विमेन्स प्रीमियर लीगच्या बहुप्रतिक्षित पहिल्यावहिल्या पर्वाच्या प्रारंभाला केवळ काही दिवस उरलेले असताना भारतातील सर्वांत मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या इझ माय ट्रिपने, यूपी वॉरिओर्झ या टीमचे फ्रँचायझी कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडशी जाहिरात करार केल्याचे जाहीर केले आहे. स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून सुरू होत असलेला हा करार पुढील पाच वर्षांसाठी आहे. या सहयोगातून मिळणाऱ्या लक्षावधी व्ह्यूजचा लाभ इझमायट्रिपला होणार आहे.

इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक निशांत पिट्टी म्हणाले, ‘इझमायट्रिपवर आम्ही सातत्याने नवोन्मेष्कारी आणि चाकोरीबाह्य मानसिकतेचे दर्शन घडवतो. कोणतेही सुविधा शुल्क न आकारून सर्व ग्राहकांना लाभ देणारी उद्योगक्षेत्रातील पहिली कंपनी ठरण्यापासून ते महिला क्रिकेटच्या चाकोरी मोडणाऱ्या प्रयत्नांतील व्यावसायिक भागीदार होण्यापर्यंत अनेक मार्गांनी इझमायट्रिप प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. डब्ल्यूपीएलला आणि या स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला असलेला आमचा अतूट पाठिंबा या सहयोगाच्या केंद्रस्थानी आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात व्यावसायिक स्तरावर सहभाग घेता आला याचा आम्हाला अत्यंत आनंद वाटतो. ही स्पर्धा येत्या काही वर्षांत महिला क्रिकेटच्या क्षेत्रातील सर्वांत मोठ्या ब्रॅण्ड्सपैकी एक ठरणार आहे. या ब्रॅण्डच्या प्रचंड संभाव्यता असलेल्या दृश्यमान स्थानाचा लाभ घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. कारण, डब्ल्यूपीएलच्या माध्यमातून होणाऱ्या प्रतिभेचे साजरीकरण बघण्यासाठी लक्षावधी चाहते टेलिव्हिजन संचांना खिळून राहणार आहेत.’