द बॉडी शॉपने भारतातील परिवर्तनाला दिली चालना

मुंबई : द बॉडी शॉप हा ओरिजिनल एथिकल ब्रिटीश ब्युटी ब्रॅण्ड भारतात नवीन कम्युनिकेशन मोहिम सुरू करत आहे, जी ब्रॅण्डचे नवीन सिग्नेचर ‘चेंजमेकिंग ब्युटी’ला अंतर्भूत करणाऱ्या तीन उल्लेखनीय महिलांना दाखवते. या मोहिमेचा जगामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकाला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास प्रशंसित आणि प्रेरित करण्याचा मनसुबा आहे.

या मोहिमेमध्ये तीन ट्रेलब्लेझिंग महिला आहेत, ज्यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रभाव निर्माण केला आहे: भारतीय अभिनेत्री शेफाली शाह, फॉवर्ड इंडियन विमेन्स फूटबॉलपट्टू बाला देवी आणि बोईंग ७७७ चे उड्डाण करणारी सर्वात तरूण महिला कमांडर अ‍ॅनी दिव्या. या प्रबळ मोहिमेच्या जाहिरातीमध्ये तीन महिला जीवनाच्या विविध स्तरांमधील त्यांच्या जीवनासंबंधित अनुभवांना सांगतात, ज्यामधून सकारात्मक परिवर्तनाच्या क्षमतेवरील त्यांचा विश्वास दिसून येतो. आपल्या स्वत:च्या शैलीमध्ये तिन्ही महिला आत्म-अभिव्यक्ती, चिकाटी आणि आत्म-प्रेमाचे प्रेरणादायी आधारस्तंभ आहेत. ब्रॅण्ड म्हणून द बॉडी शॉप हे सर्व भावनिक फायदे देतो.

द बॉडी शॉपच्या दक्षिण आशियामधील मार्केटिंग ई-कॉमर्स अ‍ॅण्ड प्रॉडक्टच्या उपाध्यक्ष हरमीत सिंग म्हणाल्या, ‘द बॉडी शॉपमध्ये आम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्यासाठी, समुदायासाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याला प्राधान्य देतो. आम्ही समाजात, सौंदर्य संस्कृतीत आणि सत्तेच्या कॉरिडर्समध्ये सकारात्मक पद्धतीशील प्रभाव निर्माण करण्यासाठी सतत काम करत आहोत. भारतातील या नवीन कम्युनिकेशन मोहिमेसह आम्ही प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वत:च्या क्षमतेसह चेंजमेकर कशाप्रकारे बनू शकते यावर प्रकाश टाकत आहोत.’

या मोहिमेमध्ये व्हिडिओज आणि सोशल मीडिया पोस्ट्सच्या सिरीजचा समावेश आहे, जी शेफाली, बाला आणि अ‍ॅनी यांच्या गाथा आणि कार्याला दाखवते. तसेच द बॉडी शॉपची सर्वात लोकप्रिय उत्पादने जसे आयकॉनिक एडलविस डेअली सीरम कॉन्सेन्ट्रेट दाखवण्यात आले आहे. हरमीत सिंग पुढे म्हणाल्या, ‘आम्ही आशा करतो की, ही मोहिम भारतीयांना परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांची स्वत:ची क्षमता ओळखण्यास प्रेरित करेल. आम्ही या अविश्वसनीय महिलांच्या गाथांच्या माध्यमातून परिवर्तनाचे सौंदर्य दाखवण्यास उत्सुक आहोत.’