विजय सेल्सचा ‘अ‍ॅपल डेज सेल’; आयफोन्स, मॅकबुक्स, अ‍ॅपल वॉचेसवर आकर्षक सवलती…

मुंबई: विजय सेल्स या भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर साखळीने पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांचा आवडता अ‍ॅपल डेज सेल आणला आहे, ज्यामधून अ‍ॅपल उत्साही आणि तंत्रज्ञानप्रेमींना त्यांचे विद्यमान डिवाईसेस अपग्रेड करण्याची किंवा अतुलनीय किमतींमध्ये नवीन अ‍ॅपलउत्पादने खरेदी करण्याची परिपूर्ण संधी मिळाली आहे. २९ एप्रिलपासून सुरू झालेला अ‍ॅपल डेज सेल त्यांच्या १२५ हून अधिक रिटेल आऊटलेट्समध्ये आणि विजयसेल्सडॉटकॉमवर सर्व आयफोन्स, मॅकबुक्स, अ‍ॅपल वॉचेस, आयपॅड्स, तसेच अ‍ॅपल अ‍ॅक्सेसरीज यावर सर्वोत्तम सूट देतो.

या सेलमध्ये आयफोन १३ फक्त ५१,४९०/- रूपयांमध्ये तर आयफोन १४ फक्त ५९,९९०/- रूपयांमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. सामान्यत: ६९,९००/- रूपये किंमत असलेला आयफोन १३ हा ६१,४९० रूपये या डील किंमतीत ऑफर करण्यात आला आहे. तसेच एचडीएफसी बँक कार्डसवर २,०००/- रूपयांची कॅशबॅक देखील मिळू शकते. याव्यतिरिक्त तुम्हाला तुमचा विद्यमान स्मार्टफोन एक्स्चेंज करायचा आहे आणि त्याची किमान एक्स्चेंज किंमत ५,०००/- रूपये असेल तर विजय सेल्समध्ये त्यामध्ये आणखी ३,०००/- रूपयांची भर होईल. म्हणजेच एकूण सूट १८,४१०/- रूपये देण्यात येईल अणि आयफोन १३ ची अंतिम किंमत फक्त ५१,४९०/- रूपये असेल.

सामान्यत: ७९,९००/- रूपये किंमत असलेल्या आयफोन १४ साठी डील किंमत ७०,९९०/- रूपये ऑफर करण्यात आली आहे. तसेच एचडीएफसी बँक कार्डसवर ४,०००/- रूपयांची कॅशबॅक देखील मिळू शकते. याव्यतिरिक्त तुम्हाला तुमचा विद्यमान स्मार्टफोन एक्स्चेंज करायचा आहे आणि त्याची किमान एक्स्चेंज किंमत ५,०००/- रूपये असेल तर विजय सेल्समध्ये त्यामध्ये आणखी ३,०००/- रूपयांची भर होईल. म्हणजेच एकूण सूट २०,९१०/- रूपये देण्यात येईल अणि आयफोन १४ ची अंतिम किंमत फक्त ५८,९९०/- रूपये असेल.
विजय सेल्स अ‍ॅपल चाहत्यांना इतर आयफोन मॉडेल्स, तसेच सिरीज ८ वॉच, मॅकबुक्स, आयपॅड्स, एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन), अ‍ॅपल अ‍ॅक्सेसरीज आणि अ‍ॅपलकेअर सर्विसेसवर विशेष किंमत ऑफर करत आहे. त्यांच्या अ‍ॅपल डेज मोहिमेचा भाग म्हणून ग्राहक प्रभावी किंमतीसह सर्व डिवाईसेसवर अविश्वसनीय ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात, ज्यामध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर कॅशबॅक ऑफर्सचा समावेश आहे.

आयफोन १४ ची किंमत ६६,९९० रूपयांपासून सुरू होते; आयफोन १४ प्लसची किंमत ७६,४९०/- रूपयांपासून सुरू होते; आयफोन १४ प्रो ची किंमत १,१७,९९० रूपयांपासून सुरू होते; आयफोन १४ मॅक्सची किंमत १,२८,४९०/- रूपयांपासून सुरू होते; आयफोन आणि आयफोन १३ ची किंमत ५९,४९०/- रूपयांपासून सुरू होते.आयपॅड श्रेणीमध्ये आयपॅड नाइन्थ जनरेशनची किंमत २६,४९०/- रूपयांपासून सुरू होते, तर आयपॅड टेन्थ जनरेशनची किंमत ३८,६८०/- रूपयांपासून सुरू होते आणि आयपॅड एअर फिफ्थ जनरेशनची किंमत ५२,७००/- रूपयांपासून सुरू होते.

लॅपटॉप श्रेणीमध्ये एम१ चिप असलेल्या मॅकबुक एअरची किंमत ७७,९००/- रूपयांपासून सुरू होते; एम२ चिप असलेल्या मॅकबुक एअरची किंमत १,०२,७९०/- रूपयांपासून सुरू होते; एम२ चिप असलेल्या मॅकबुक प्रो ची किंमत १,११,९००/- रूपयांपासून सुरू होते; एम२ प्रो चिप असलेल्या मॅकबुक प्रो ची किंमत १,७४,९००/- रूपयांपासून सुरू होते.

वॉचेस श्रेणीमध्ये अ‍ॅपल वॉच सिरीज ८ ची किंमत ३९,९९०/- रूपयांपासून सुरू होते; अ‍ॅपल वॉच एसई (सेकंड जनरेशन)ची किंमत २५,९९०/- रूपयांपासून सुरू होते; अ‍ॅपल वॉच अल्ट्राची किंमत ८०,३९०/- रूपयांपासून सुरू होते. ऑडिओ श्रेणीमध्ये मॅगसेफ चार्जिंग केस असलेल्या एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) २३,४९०/- रूपये किंमतीत उपलब्ध असेल.