रंगभूमीवर धिंगाणा ‘सर्किट हाऊस’चा…

मुंबई:पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेले ‘सर्किट हाऊस’ हे नाटक सध्या रंगभूमीवर धिंगाणा घालत असून ते प्रेक्षकांचे पैसे वसूल करत आहे.

‘श्री कला प्रॉडक्शन’ निर्मित आणि ‘रॉयल थिएटर’ व ‘भूमिका थिएटर्स’ प्रकाशित या नाटकाचे लेखन गौतम जोगळेकर यांनी केले आहे. विजय केंकरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.

संजय नार्वेकर, गणेश पंडित, अंकुर वाढवे, प्रमोद कदम, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, माधुरी जोशी, सावित्री मेधातुल आणि सुषमा भोसले अशा आघाडीच्या कलावंतांची फळी या नाटकात भूमिका साकारत आहे. या निमित्ताने लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर हे पुन्हा एकदा रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहेत. मिहीर गवळी व श्रीकांत तटकरे हे या नाटकाचे निर्माते आहेत.