मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलात सोमवार दिनांक २९ एप्रिलला माधुरीबेन मनसुखलाल वसा सभागृहात कौशल्य विकास उन्हाळी शिबिराचा समापन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला. वार्षिक परीक्षा झाल्यावर मुलांच्या फावळ्या वेळेचा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास पूरक अशा चित्रकला ,लाठीकाठी नृत्य ,संगीत ,अभिनय मल्लखांब आणि कम्प्युटर क्लब , विज्ञान प्रयोग या विद्यार्थीप्रिय कला विषयांचे १४ दिवसांचे शिबीर आयोजित केले गेले.
श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर, विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कूल आणि कमला रहेजा विद्यानिधी ज्युनिअर कॉलेज या तीन विद्याशाखातील विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. समापन समारंभात इयत्ता पाचवी- सहावीच्या विद्यार्थ्यांनी एस .एम. विटा संगणक कक्षात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले . शिबिरातून विद्यार्थ्यांना स्वतः परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला .या कार्यक्रमासाठी इनर व्हील क्लब बॉम्बे एअरपोर्ट टीआराच्या मालव मेहता, सोनाली पारेख आणि त्यांच्या सहकारी उर्मिला महाजन मुख्य प्रत्यारोपण समन्वयक झेड.टी.सी.सी मुंबई तसेच उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, मधुकुमार राठी, मुख्याध्यापिका निलम प्रभू अन्य मान्यवर उपस्थित होते.
समारोपाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, संगीत, चित्रकला व मल्लखांबांची प्रात्यक्षिके सादर केली. अवयवदान आणि मतदान जनजागृती या विषयांवर भाष्य करणाऱ्या नाटिकांचे सादरीकरण करण्यात आले.सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यानिधी शैक्षणिक संकुलात दिला जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे निवेदन सुश्मिता पाटील यांनी केले.