७८ टक्के महिला उद्योजकांसाठी कुटुंब सर्वात मोठा प्रेरणास्रोत

मुंबई:महिला उद्योजकांसाठी कुटुंब सर्वात मोठे प्रेरणास्रोत आणि समर्थक आहे. जवळपास ३१ टक्के महिलांची त्यांच्या कुटुंबासाठी उज्ज्वल भविष्य असण्याची इच्छा आहे, तसेच २८ टक्के महिलांची ‘अतिरिक्त उत्पन्ना’सह त्यांच्या कुटुंबांना साह्य करण्याची इच्छा आहे. ७८ टक्के महिला व्यवसाय सुरू करताना सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणून कुटुंबाला प्राधान्य देतात. बहुतांश ७७ टक्के महिला म्हणतात की, त्यांच्या यशासाठी कुटुंब ‘प्रमुख घटक’ आहे, असे सर्वेक्षणात आढळून आल्याचे टाइडचे ग्लोबल सीईओ ऑलिव्हर प्रिल आणि टाइड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुर्जोधपाल सिंग म्हणाले. टाइड इंडियाने आपल्या पहिल्या बीडब्ल्यूएआयसाठी द्वितीय व त्यापलीकडील श्रेणीच्या शहरांमधील १८ ते ५५ वर्ष वयोगटातील १,२०० हून अधिक नवीन आणि विद्यमान व्यवसाय मालकांचे सर्वेक्षण केले. त्यात वरील निष्कर्ष निघाला.