दक्षित सुशिल भालेरावचे इनलाईन स्केटिंग स्पर्धेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड…

बदलापूर:दक्षित सुशिल भालेरावने इनलाईन स्केटिंग स्पर्धेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. इंडियन स्कूल ऑफ स्केटिंग अ‍ॅकेडमी बदलापूरचे प्रशिक्षक मनिषा गावकर आणि अथर्व गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षित सुशिल भालेरावने कर्नाटकच्या बेळगाव येथे आयोजित ४८ तास जलद १०० मीटर इनलाईन स्केटिंग स्पर्धेत भाग घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. बदलापूरचा दक्षित सुशिल भालेरावचे वय ८ वर्षे असून तो योगीश्री अरविंद गुरुकुल शाळेत तिसरीत शिकत आहे.दक्षितने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.