भारत ‘स्वास्थ शुद्धी’द्वारे पोषक आहारयुक्त करण्याचा निर्धार

मुंबई:आजच्या काळात सकस आहाराच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य लोक हे वेगवेगळ्या आजारांना बळी पडले आहेत. मधुमेह तर प्रत्येक ४ ते ५ व्यक्तींपैकी एकामध्ये आढळतो. त्याचसोबत हृदयविकार, स्थूलपणा, रक्तदाब हे सर्रास आढळणारे आजार झाले आहेत. नेमकं हेच लक्षात घेऊन सुशील कुमार शर्मा यांनी आपल्या ‘सब का स्वास्थ’ या उत्पादक संस्थेद्वारे ‘स्वास्थ्य शुद्धी’ नावाच्या उत्पादनाचे अनावरण केले आहे.

‘स्वास्थ्य शुद्धी’चे आपल्या दैनंदिन आहारासोबत सेवन केल्यास शरीराला आवश्यक असणारे विविध पोषक तत्व मिळतात. परिणामी विविध आजार दूर राहण्य़ास मदत होते. निव्वळ १५ दिवसांत शरीर हलके वाटू लागते. अनावश्यक मेद कमी होतो. पचनक्रिया सुधारते. परिणामी शरीर तंदुरुस्त होते.

लहान मुलांना आपण खिचडी, असे विविध अन्नाचे पर्याय देतो. मात्र उतार वयात पचनशक्ती कमी झालेली असते. काहीजणांचं जीवन तर डॉक्टरांच्या औषधांवर अवलंबून असते. बहुतांशजण औषधी गोळ्या एखाद्या जेवणासारखे घेतात. ही समस्या जाणून सुशील कुमार शर्मा यांनी स्वास्थ्य शुद्धी हे उत्पादन विकसित केले. त्यावर प्रक्रिया करुन योग्य तापमान आणि उत्तम ठिकाणी या धान्यांची साठवणूक केली जाते. त्यांच्या पोषकतत्वांचे प्रयोगशाळॆत परिक्षण होते. त्यानंतर सुयोग्य, सकस असे हे उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले जाते.

हे उत्पादन जम्मू, पंजाब, हरयाणा आणि महाराष्ट्रात कमालीचे यशस्वी ठरले. सर्वसामान्यांना स्वास्थ्य शुद्धीचा लाभ झाला. हा लाभ भारतातील इतर प्रदेशातील लोकांना व्हावा या द्देशाने हे उत्पादन भारतभर पोहोचविण्याचा मानस आहे. भारत आणि इतर देशांमध्ये संसाधनांसह वितरित केले जाईल. मध्य प्रदेश येथील उज्जैन येथे उत्पादन यशस्वी झाल्यानंतर इंदौर येथे देखील उत्पादन बाजारपेठेत आणले जाणार आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथे देखील हे उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.

संपूर्ण भारत देश पोषक आहाराच्या माध्यमातून सशक्त करणे हे शर्मा यांच्या सब का स्वास्थ्य संस्थेचे उद्दीष्ट आहे. या अभियानासोबत कोणाला जोडायचे असेल तर तो स्वास्थ्य शुद्धी या उत्पादनाचा वितरक बनू शकतो. संपूर्ण भारतात असे वितरण नेमायचे आहेत. या वितरणा व्यतिरिक्त संस्था व्यायाम केंद्र आणि योगाभ्यास केंद्र देखील सुरु करणार आहे. त्याचप्रमाणे सब का स्वास्थ्य संस्थेच्या मोबाईल ऍपचे देखील अनावरण करण्यात येणार. अगदी लहान मुलगा देखील हे ऍप हाताळू शकतो इतका तो वापरण्यास सुलभ आहे. या ऍप वरुन सर्वसामान्य व्यक्ती आपल्या आजारांची माहिती शेअर करु शकतील. त्याचप्रमाणे या ऍप मध्ये आजारी व्यक्तींच्या आजाराचा इतिहास नमूद केल्यामुळे भविष्यात कोणत्याही विशेषज्ञ डॉक्टरला आजाराचे निदान करण्य़ास सुलभ होईल. तरुणांनी सशक्त भारत उभारण्यासाठी आमचे वितरक बनून चळवळीत सामील व्हावे, असे आवाहन ‘सब का स्वास्थ’चे संस्थापक सुशीलकुमार शर्मा यांनी केले आहे.