संकटग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहे, त्यांना दिलासा देण्यातही सरकार अपयशी… – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई : ‘गत वर्षभरात नैसर्गिक संकटामुळे राज्यात लाखो हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाले, शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाने फक्त मदत जाहीर केली. ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. पिकविमा योजनेत विमा कंपन्यांना फायदा झाला, परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम झालं आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर करून देखील अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही, तसेच बँक देखील सीबीचा मुद्दा उपस्थित करून तसेच विविध कारणे देऊन शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. आपले सरकार अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या संकटकाळात राज्यशासन पाठीशी नसल्यांच दुदैवी चित्र आज राज्यात आहे.’असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

विदर्भ, मराठवाडा, कोकणातील धान, तूर, कापूस, कांदा, सोयाबीन पिक उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून कोणताचा दिलासा मिळाला नाही. नैसर्गिक आपत्ती, खतं, बियाणे, किटकनाशकं, शेती अवजारांच्या दरात, वाहतूक खर्चात झालेली वाढ, त्यातच बोगस बियाणे-खते यांचा विविध जिल्ह्यामध्ये झालेला शिरकाव अशा अनेक कारणांमुळे संकटग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहे, त्यांना दिलासा देण्यातही सरकार अपयशी झाले आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं असून विरोधी पक्ष आज विधान भवनातील पायऱ्यांवर उतरला. विरोधी पक्षांनी ‘शासन आपल्या दारी बळीराजा कर्जबाजारी’ ‘शासन आपल्या दारी एकही योजना नाही खरी’ ‘शासन आपल्या दारी उपाशी आमचा शेतकरी’ अशा घोषणा देत सरकारचा विरोध केला.