इकोफायचा पियाजिओ वेईकल्ससोबत सहयोग

मुंबई: भारतातील अद्वितीय ग्रीन-ओन्लीय एनबीएफसी इकोफायने इटालियन ऑटो कंपनी पियाजिओ ग्रुपची १०० टक्के उपकंपनी आणि भारतातील लघु व्यावसायिक वाहनांची अग्रणी उत्पादक आणि इलेक्ट्रिक तीन-चाकींची अग्रणी कंपनी पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) सोबत सहयोग केला आहे. या धोरणात्मक सहयोगाचा पियाजिओच्या प्रगत तीन-चाकी ईव्ही ऑफरिंग्जच्या श्रेणीमधून कार्गो आणि पॅसेंजर युटिलिटीसाठी इलेक्ट्रिक तीन-चाकी खरेदी करू पाहणारे व्यक्ती आणि कॉर्पोरेशन्सना एकसंधी आर्थिक साह्य प्रदान करण्याचा मनसुबा आहे. वितरित करण्यात येणाऱ्या पहिल्या ५० वाहनांसाठी ० टक्के प्रक्रिया शुल्क यांसारख्या ऑफर्ससह पियाजिओ वेईकल्स चालू आर्थिक वर्षामध्ये ८०० वाहने वितरित करण्यासाठी इकोफायच्या युजर-अनुकूल आणि पूर्णत: डिजिटल फायनान्सिंग सोल्यूशन्सचा लाभ घेईल.

हा सहयोग महिला उद्योजकांना पसंतीनुसार कर्जसुविधा देखील देईल आणि लास्ट-माइल डिलिव्हरीसाठी तीन-चाकी ईव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहक विभागाचे लक्ष वेधून घेण्याचा देखील मनसुबा आहे. इकोफायचा व्यक्ती आणि उद्योगांना इलेक्ट्रिक तीन-चाकी सारख्या पर्यावरणास-अनुकूल मालमत्तावर्गासाठी आकर्षक आर्थिक सोल्यूशन्स प्रदान करत निव्व ळ शून्य कार्बन उत्सर्जन असलेल्या भविष्याकडील परिवर्तनाला चालना देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांमध्ये पाठिंबा देण्याचा उद्देश आहे.

इकोफायच्या सह-संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री नम्बियार म्हणाल्या, ‘इकोफाय पर्यावरणदृष्ट्या जागरूक जीवनशैलीचा आत्मसात करणाऱ्या व्यक्ती आणि लघु व्यवसायांना आर्थिक साह्य करण्याच्या माध्यमातून निव्वळ-शून्य उत्सर्जनासह शाश्वत भविष्याला चालना देण्याप्रती समर्पित आहे. इलेक्ट्रिक तीन-चाकींना बाजारपेठेत ५० टक्के प्रवेश करण्यासोबत २०३० पर्यंत ही पोहोच ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याच्या अपेक्षेसह आम्हाबला पियाजिओ वेईकल्ससोबत सहयोग करत त्यांच्या अवलंबतेला गती देण्याचा आनंद होत आहे. आमच्या सहयोगाचा आमच्या बहुमूल्य ग्राहकांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली सानुकूल उत्पादने आणि एकसंधी ग्राहक अनुभव देण्याचा मनसुबा आहे. सहयोगाने आम्ही इलेक्ट्रिक तीन-चाकींचा अवलंब करण्याला गती देण्याचा आणि हरित परिवहन इकोसिस्टमप्रती योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत.’