झेल एज्युकेशनद्वारे फायनान्स फ्रंटियर्स कॉन्क्लेव्हचे आयोजन

मुंबई : झेल एज्युकेशन या भारतातील अग्रगण्य फायनान्स आणि अकाऊंट्स एड-टेकने फायनान्स फ्रंटियर्स कॉन्क्लेव्ह २०२३ च्या पहिल्या पर्वाचे आयोजन केले. या कॉन्क्लेव्हने उद्योग प्रमुखांचे नेतृत्व असलेला सर्वोत्तम समुदाय तयार करण्याची विशेष संधी दिली. या कार्यक्रमात प्रमुख भाषण, पॅनेल चर्चा, प्रश्नोत्तरे आणि नेटवर्किंग अशा अनेक सत्रांचे आयोजन करण्यात आले. झेल एज्युकेशन आणि नॉलेज पार्टनर ईवायचा विशेष कार्यक्रम फायनान्स अ‍ॅण्ड अकाऊंटिंगमध्ये आपले करिअर घडवण्याचे नियोजन करत असलेल्या विद्यार्थ्यां साठी डिझाइन करण्यात आला होता आणि उद्योग प्रमुखांसह गेम-चेंजिंग माहिती आणि नेटवर्किंग संधींवर लक्ष केंद्रित केले. १५० हून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

झेल एज्युकेशनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रथम बरोट म्हणाले, ‘अशा मोठ्या दर्जाच्या कॉन्क्लेव्हचे आयोजन करणे आणि लक्षणीय सहभागाची नोंद करणे उत्तम अनुभव होता. आम्ही महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना विविध फायनान्स अ‍ॅण्ड अकाऊंटिंग पदांमध्ये अपस्किल होण्याकरिता विश्वसनीय व्यासपीठ बनण्याचा नेहमी प्रयत्न करत असताना त्यांच्यासाठी प्रत्यक्ष उद्योगातील तज्ञांसोबत परस्परसंवाद साधण्याकरिता संधी निर्माण केल्याने त्यांना भविष्यात फायदा होईल. आम्ही आमचे प्रवक्ते-पॅनेलिस्ट्सचे देखील आभार मानतो, ज्यांनी वेळात वेळ काढून फायनान्स प्रोफेशनल्सच्या वाढत्या समूहासह त्यांचे ज्ञान, अनुभव, आधुनिक ट्रेण्ड्स आणि उद्योगाच्या सर्वोत्तम पद्धतींबाबत सांगितले.’

झेल एज्युकेशनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रथम बरोट यांच्या प्रमुख आणि स्वागत भाषणासह कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर ‘फ्रॉम अकाऊंटिंग स्टुडण्ट टू सीएफओ: करिअर प्रोग्रेशन इन एफ अ‍ॅण्ड ए’ या विषयावर पॅनेल चर्चा झाली. यामध्ये उद्योगातील प्रख्यात पॅनेलिस्ट्स ईवाय येथील फायनान्शियल सर्विसेस टॅक्स प्रॅक्टिसचे सहयोगी व प्रमुख केयूर शाह, प्रायव्हेट इक्विटी सर्विसेसचे सहयोगी आणि राष्ट्रीय प्रमुख विवेक सोनी, ईवाय येथील टॅलेण्ट डायरेक्टर निधी सोनी आणि बॉम्बे कॅपिटलचे संस्थापक आणि सीआयओ पार्थ गांधी यांचा समावेश होता.