केशवराव मोरे पुरस्कार दिग्दर्शक मोहन साटम आणि अभिनेत्री आशा ज्ञाते यांना घोषित !

ठाणे : नटवर्य श्री केशवराव मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिष्य मंडळीकडून सुरू करण्यात आलेल्या केशवराव मोरे फाऊंडेशन यांच्या वतीने यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. केशवराव मोरे पुरस्काराचे मानकरी यंदा ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक मोहन साटम ठरले आहे. तसेच लक्षवेधी पुरस्काराचा बहुमान अभिनेत्री आशा ज्ञाते यांना जाहीर झाला आहे. याशिवाय पडद्यामागील कलाकार एकनाथ तळगांवकर यांना दुसरा लक्षवेधी पुरस्कार जाहीर झाला आहे .येत्या बुधवारी १५ मार्च २०२३ ला ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केशवराव मोरे फांऊडेशनच्या वतीने प्रथमच एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याची पहिली फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ती बुधवारपर्यंत चालणार आहे. १५ मार्च २०२३ ला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. अष्टविनायक नाट्य संस्थेचे प्रमुख दिलीप जाधव हे या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असणार आहे.