‘दर्जेदार शिक्षणात नाट्यकला विषयही हवा…’ २० मार्च ‘जागतिक बालरंगभूमी दिनी’ मुलांची मागणी !

पुणे : गुरुस्कूल फाऊंडेशन गुफानचा २० मार्च जागतिक बाल रंगभूमी दिनाच्या विशेष दिनी प्रयोग, प्रशिक्षण, प्रकाशनाचे आयोजन केले. त्यावेळी मुलांनी आम्हाला शाळेत नाटक विषय हवा, तो आम्हाला मनातील विचार आणि कल्पना मांडायला मदत करतो, आमचे इतर अवघड विषयातही मन लागते. असे बोलून अंजली चव्हाण, श्रावण मोरे, सिध्दांत नगरकर या मुलांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपली मागणी सर्व पालक शिक्षक यांच्यासमोर केली.

‘जसा खेळाचा तास तसे नाटकाचे खेळ (रंगमंचीय खेळ) शाळेच्या वेळापत्रकात प्रत्येक शाळेने घ्यायला हवेत,’ असे विचार ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ज्ञ प्रा. देवदत्त पाठक यांनी World Children’s Theatre Association (WCTA) च्या धोरणाला अनुसरूत केले आणि नाट्य कार्य शाळा घेतली. International Association of Theater for Children and Young People (ASSITE) यांनी रुजविलेल्या नाटकाची जादू (Theatre magic) या संकल्पनेला प्रा.देवदत्त पाठक यांनी यावेळी प्रत्यक्षात आणले . मुलांना नाटक दाखवा आणि करायलाही संधी द्या असे मत नाट्य प्रशिक्षक मिलींद केळकर यांनी व्यक्त केले. या विशेष दिवशी ,पट्टी, चेटकीण, टीफिन या कवितांचे नाट्य सादरीकरण, ‘खोळंबा’ या कथेचे दृष्य नाट्य दर्शन आणि ‘आमचं काय चुकतयं’ या देवदत्त पाठक लिखित आणि मिलींद केळकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनोख्या नाट्य सादरीकरणाने पालक प्रेक्षकांना नाट्य कलेचे महत्व या निमित्ताने मुलांनी लक्षात आणून दिले.

यावेळी नाट्य संदेशाचे वाचन आणि आम्ही नाटक करणारच, या शपथेतून मुलांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या. यावेळी सामजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे, सीमा जोगदनकर, डॉ.नितीन जाधव,उ मेश संत, चिदानंद जोगदन कर, कल्पना शेरे उपस्थित होते.