प्रत्येक रंगकर्मीने आपला काही काळ हा गावातील मुलांसाठी देणे गरजेचे…- प्रा. देवदत्त पाठक


गाव आणि वस्त्यांवरती मुले ही अत्यंत कलेसाठी आसुसलेली आहेत…

पुणे: महाराष्ट्रातील २१ गावे, पाडे आणि वस्तीवर जाऊन बालरंगभूमी प्रसारासाठी रखरखत्या उन्हाळ्यात अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा अभिनव पद्धतीने घेण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने रंगमचीय खेळातून मानसिक ,बौद्धिक आणि शारीरिक पातळीवरती विकास करत कला निर्मितीसाठी झाला. मुलांनी प्रत्येक कार्यशाळेच्या शेवटी छोटे आयत्या वेळचे नाट्य सादरीकरण केले. मुलांचे भावविश्व आणि विचार – कल्पना याला प्राधान्य देऊन नाट्य सादरीकरण करण्यात आले विशेषतः गाव आणि वस्त्यांवरती मुले ही अत्यंत कलेसाठी आसुसलेली आहेत, त्यांच्या कला स्वातंत्र्य अभिव्यक्तीसाठी या कार्यशाळा अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या, असे प्रा. देवदत्त पाठक यांनी नमूद केले आहे. यावेळी कला व्यवस्थापन यातून वर्तन तंदुरुस्तीचे धडे मुलांनी या निमित्ताने गिरवले.या निमित्ताने मुलांना समूहामध्ये काम करण्याची कला उमजली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पाठक सरांबरोबर त्यांचे सहयोगी सहाय्यक विद्यार्थी मिलिंद केळकर यांनी मोलाची साथ दिली आणि गुरुस्कूल गुफांनची टीमच्या संयोजनामध्ये धनश्री गवस, अक्षता जोगदनकर ,नेहा कुलकर्णी , आकाश भुतकर आणि सीमा जोगदनकर, अक्षता जोगदंनकर, साहिल शेटे आलोक जोगदनकर विद्यार्थी टीमने प्रामुख्याने सहभाग सहकार्य केले.उन्हाळ्याच्या सुट्टीतील अभिनय प्रबोधन कार्यशाळांचे हे दहावे वर्ष आहे. आजपर्यंत सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, नाशिक ,बार्शी ,ठाणे, पनवेल ,चंद्रपूर, नंदुरबार, धुळे जळगाव, अमरावती ,परभणी, अकोला यांच्यासह पुण्यातील आजूबाजूची उपनगरे यामध्ये लमान तांडा ,बिबेवाडी कोटा ,कात्रज वसाहत, तसंच आंबेगाव नऱ्हे येथील संस्था आणि शाळा यांच्या मदतीने कार्यशाळा तेथील संस्थापक आणि संयोजक घेण्यात आल्या. यामध्ये गिनी बाई हायस्कूल महर्षी कर्वे संस्था अक्षरदीप, रेज ऑफ होप बिबेवाडी ओटा ,एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, बालरंगभूमी परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद तसंच वेगवेगळ्या शैक्षणिक आणि नाट्य कला संस्थांनी याचे आयोजन केले.

नाट्यकला प्रशिक्षणाची पद्धतच बदलणे गरजेचे आहे, त्यामधील नेहमीच एकसुरी आणि व्यावसायिक असणाऱ्या पद्धतीत बदल करून त्यासाठी रंगमंचीय खेळ यातून लेखन दिग्दर्शन अभिनय नेपथ्य संगीत कला व्यवस्थापन यावरचे रंगमंचे खेळ घेतले.मुलांमध्ये रंगभूमी कलेची आवड निर्माण करून त्यातच पुढे काही जर का करिअर करता आले तर अशा प्रकारच्या कार्यशाळांचा उपयोग होईल, ज्यामुळे नाट्यकला क्षेत्रामध्ये नव्याने येणारे कलाकार यांची अभिरुची त्यांची आवड आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के द्यावा लागणारा वेळ आणि सातत्य यासाठी मुले विचार करतील असे प्रतिपादन गुरुवर्य देवदत्त पाठक केले.