‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे उत्कृष्ट ‘पौलमी कलेक्शन’

मुंबई:आभूषण उद्योगात समृद्ध परंपरा असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे पोल्की अर्थात अनकट डायमंड ज्वेलरीची श्रेणी असलेले पौलमी कलेक्शन सादर करण्यात आले आहे. हे कलेक्शन १८ मे पासून पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि नागपूरसह निवडक ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या विशेष कलेक्शन मधील दागिने राजेशाही आणि आधुनिक आहेत, जे उत्कृष्टतेचे प्रतिनिधित्व करतात. ‘फ्रॉम रॉयल ऑफ हिस्ट्री टू द रेअर रेग्युलर ऑफ टुडे’ ही संकल्पना केंद्रस्थानी असलेल्या या मोहिमेद्वारे पौलमी कलेक्शनचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट आजच्या स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन जीवनात या उत्कृष्ट आणि सुलभ दागिन्यांच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे हे आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे पौलमी कलेक्शनमधील दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्के विशेष सवलत मिळणार आहे. कच्च्या, नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या पोल्की म्हणजेच अनकट हिऱ्यांच्या कालातीत आकर्षणाने हे कलेक्शन प्रेरित आहे. पारंपरिकपणे राजघराण्यांच्या पसंतीस उतरलेले, हे हिरे कापलेल्या समकक्षांसारखे चमकत नाहीत; परंतु यात एक अद्वितीय सौंदर्य आहे, जे आकर्षित करते. राजेशाही सौंदर्याने कोणताही पेहराव सुंदर व पूर्ण करण्यासाठी योग्य असलेल्या पोल्की ज्वेलरीला आजच्या आधुनिक फॅशनच्या दुनियेत,एक स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून पसंती आहे.

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले,‘‘पौलमी कलेक्शनसह, प्रत्येक स्त्रीला अद्वितीय अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. हे कलेक्शन केवळ दागिने नसून, ते अभिजातता, वारसा आणि आधुनिकतेचा मिलाफ आहेत. ऐतिहासिक काळापासून स्त्रियांच्या पसंतीस असलेल्या पोल्की दागिन्यांना समकालीन डिज़ाईन्समध्ये अंतर्भाव करून हे कलेक्शन आधुनिक महिलांसाठी उपलब्ध करून देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.

पौलमी कलेक्शनमध्ये पोल्की हिरे हे जागतिक स्तराच्या कलाकुसरीने तयार केले गेले आहेत जे मोहक आणि आकर्षक प्रकारच्या दागिन्यांसाठी डिझाइन केले आहेत. स्टेटमेंट नेकलेसपासून ते नाजूक ब्रेसलेट्सपर्यंत, प्रत्येक दागिना हा पोल्कीच्या नैसर्गिक सौंदर्यावर प्रकाश टाकण्यासाठी तयार केला असून या पारंपारिक दागिन्यांकडे एक नवीन दृष्टीकोन प्रदान करतो. हे कलेक्शन प्राचीन काळातील दागिन्यांमधून प्रेरित आहे. प्रत्येक स्त्रीला गुणवत्ता किंवा अभिजाततेचा तडजोड न करता स्वतःला कालातीत दागिन्यांचा वापर करता यावे यासाठी पौलमी कलेक्शन हे किफायतशीर दरात तयार करण्यात आले आहे.