पुणे : गंधर्वसख्यम् … ही कथा आहे या डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या जमान्यात पृथ्वीवर अवतरलेल्या एका गंधर्वांची आणि त्याच्या कांतेची. सखिश्री आणि काव्य गंधर्व… काही रहस्यमय घटना क्रमांमुळे शाप मिळून पृथ्वीवर आलेल्या आणि पूर्व स्मृती नसलेल्या सखि श्री साठी काव्य हा गंधर्व लोकातील बंधने झुगारून पृथ्वी तलावर येतो. त्याला केवळ संस्कृत भाषा येत असते.
काव्य गंधर्व सखीला पूर्व स्मृतींची जाणीव करून देऊ शकतो का, त्याला गंधर्व लोकाचे नियम तोडल्यामुळे काय परिणाम भोगावे लागतात, सखिश्रीच्या शापला भेद दिला जातो का नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे उलगडतात ती गंधर्वसख्यम् या अभिनव आविष्करणात. सादरीकरणाची मुख्य भाषा मराठी असली तरी अत्यंत खुबीने यात संस्कृत संवाद तसेच सुभाषिते याची गुंफण आहे.
याचसोबत नव्याने रचलेली ११ संस्कृत- मराठी / संस्कृत – हिंदी अशा द्वैभाषिक गीतांचे यामध्ये गुंफण आहे. आजची टीन एजर मुलं काहीही अर्थ कळत नसतानाही स्पॅनिश, कोरियन गाणी गाताना दिसतात. मग संस्कृतने पण कात टाकून नव्या पिढीला का आकर्षित करू नये. म्हणूनच सुसंस्कृत शृंगारप्रधान असणारी गीते मोहक अशा चालीत यात बांधली आहेत.
संहिता – डॉ. श्रीहरी गोकर्णकर
कथा आणि संगीत – प्रांजल अक्कलकोटकर
काव्य आणि दिग्दर्शन – डॉ. श्रीहरी गोकर्णकर आणि प्रांजल अक्कलकोटकर
निर्मिती – संस्कृतश्री
कलाकार
काव्यगंधर्व – सौमिल कारखानीस
सखीश्री – गंधाली घैसास
श्रीगंधर्व (राजा) – ओमकार जोशी
नवगन्धर्व – ओम फडणीस
नवगन्धर्वाची कांता – रेवती देशमुख
सुरभी – रेणुका घैसास
काव्यगंधर्वाचे महाविद्यालयातील मित्र – प्रांजल अक्कलकोटकर, अखिलेश काकडे, हृषीकेश देसाई
नर्तक – ओम फडणीस, सानिया पेठे, रेणुका घैसास, रेवती देशमुख आणि अपूर्वा नरे
अभिवाचक – अमेय जोशी आणि डॉ. श्रीहरी गोकर्णकर
गायक – प्रांजल अक्कलकोटकर आणि वेदांगी पटवर्धन
वाद्यवृंद
गिटार – अखिलेश काकडे आणि हृषीकेश देसाई
कीबोर्ड – सई जोशी
तबला – मिलिंद फडके आणि सौमिल फडके
संतूर – योगेश सुमंत
पार्श्वसंगीत – हृषीकेश देसाई आणि शौनक पिंपुटकर
नेपथ्य – प्रांजल अक्कलकोटकर
प्रकाशयोजना – सोहम दायमा