ट्रेसा मोटर्सद्वारे इलेक्ट्रिक ट्रक ‘व्ही०.१’ चे अनावरण

मुंबई : ट्रेसा मोटर्सने आपल्या उल्लेखनीय अ‍ॅक्सियल फ्लक्स मोटर प्लॅटफॉर्म फ्लक्स३५० वर निर्माण केलेला पहिला इलेक्ट्रिक ट्रक मॉडेल व्ही०.१ चे (V0.1) अनावरण केले आहे. जागतिक बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आलेल्या या ट्रकच्या अनावरणामधून मध्यम आणि अवजड इलेक्ट्रिक ट्रकसाठी औद्योगिक डिझाइन, अ‍ॅक्सियल फ्लक्स पॉवरट्रेन आणि सुरक्षित बॅटरी पॅक्सप्रती ट्रेसा मोटर्सचा क्रांतिकारी पुढाकार दिसून येतो. हा विकास ट्रेसाची नाविन्यतेसाठी अविरत कटिबद्धता आणि शाश्वत परिवहन सोल्यूशन्सद्वारे संचालित भविष्याप्रती दृष्टिकोनाशी संलग्न आहे.

सध्या भारतात २.८ दशलक्ष ट्रक्सचा ताफा आहे, ज्यामधून ६० टक्के कार्बन उत्सर्जन होते. यामुळे मध्यम आणि अवजड ट्रक्ससाठी शून्य उत्सर्जनांची त्वरित गरज दिसून येते. २०२४ मधील आगामी वेईकल स्क्रॅपेज पॉलिसी आणि वाढत्या इंधन खर्चांसह मध्यम व अवजड इलेक्ट्रिक ट्रक्सचा अवलंब करण्याची वेळ आली आहे. ट्रेसा मोटर्सचा पारंपारिक डिझेल ट्रक्ससाठी मालकी हक्काचा कमी खर्च असलेले सुरक्षित, नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय देण्याच्या माध्यमातून या परिवर्तनाचे नेतृत्व करण्याचा मनसुबा आहे. ट्रेसा मोटर्स एकाच वेळी भारतातील २.८ दशलक्ष ट्रक्सना इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा प्रयत्न करते.

ट्रेसा ट्रक्सचे मुलभूत तत्त्व त्यांचे अ‍ॅक्सियल फ्लक्स मोटर तंत्रज्ञान फ्लक्स ३५० मध्ये सामावलेले आहे. यामधून जवळपास ३५० केडब्ल्यूची सतत शक्ती मिळते, ज्यामुळे अशा प्रकारचे पॉवर आऊटपुट देणारी ट्रेसा एकमेव भारतीय ओईएम आहे. अ‍ॅक्सियल फ्लक्स मोटर्स त्यांचा सुसंगत आकार आणि हलक्या वजनासाठी प्रख्यात आहेत. जगातील उपयुक्त अ‍ॅक्सियल फ्लक्स मोटर्स उत्पादकांसोबत सहयोगाने पूर्णत: भारतात विकसित करण्यात आलेले हे इलेक्ट्रिक ट्रक्स ट्रेसा मोटर्सला जागतिक नवोन्मेष्कारामध्ये अग्रस्थानी ठेवतात.

ट्रेसा मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन श्रवण म्हणाले ‘ट्रेसाच्या मॉडेल व्ही०.१ च्या ऑफिशियल लाँचचा प्रवास आणि आमच्या अ‍ॅक्सियल फ्लक्स मोटर प्लॅटफॉर्मचा विकास असाधारण राहिला आहे. आमच्या स्थापनेपासून बरेच काही घडले आहे. आम्ही अनेक आव्हानांवर मात केली. आज मला सांगताना आनंद होत आहे की, मी आपल्या प्रवासाला गती देण्यासाठी ट्रेसाच्या टीममध्ये सामील झालेल्या उद्योगातील काही सर्वात आदरणीय व अनुभवी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत आहे. एकूण ट्रेसामध्ये टीमने आपल्या करिअर्समध्ये (भारत, जर्मनी, यूएस व जपान) २०० हून अधिक प्रकारचे ट्रक्स डिझाइन व निर्माण केले आहेत आणि यापूर्वी २ दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे.’

उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी शेकडो घटक उत्तमरित्या डिझाइन करण्यासाठी एएनएसवायएस आणि एमएटीएलएबी येथे अनेक महिने मोठ्या प्रमाणत सिम्युलेशन्स करण्यात आले. या प्रखर दृष्टिकोनामधून ट्रेसा मोटर्सची प्राधान्य तत्त्वांसह उत्पादने डिझाइन आणि निर्माण करण्याप्रती कटिबद्धता दिसून येते.

ट्रेसा मोटर्सचे मध्यम आणि अवजड इलेक्ट्रिक ट्रक्स व्यावसायिक वाहन उद्योगामधील प्रमुख झेप आहेत, जे अद्वितीय पॉवर, कार्यक्षमता व पर्यावरणीय फायदे देतात.या मेड इन इंडिया उत्पादनामधून ब्रॅण्डची स्थानिक टॅलेंट आणि आर्थिक विकासाला चालना देण्याप्रती कटिबद्धता दिसून येते. या लाँचसह ट्रेसा मोटर्स भारतातील आणि भारताबाहेरील इलेक्ट्रिक वेईकल स्थितीत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. ट्रेसा मोटर्स आर्थिक वर्ष २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत मॉडेल व्हीचे प्रत्यक्ष लाँच करणार आहे.