ब्लूसेमीद्वारे लाइफस्टाइल गॅझेट ‘ईवायव्हीए’ची बुकिंग !

मुंबई : पहिल्या दोन बुकिंग टप्प्यांमध्ये उल्लेखनीय यशाची नोंदणी केल्यानंतर ब्लूसेमी ही आपल्या प्रमुख ऑफरिंगच्या माध्यमातून व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याप्रती कटिबद्ध असलेली भारतातील अग्रगण्य हेल्थटेक स्टार्टअप तिचे क्रांतिकारी मेड इन इंडिया उत्पादन ईवायव्हीएसाठी (EYVA) फ्लॅश बुकिंग्जमधील बुकिंगचा तिसरा टप्पा अभिमानाने सुरू करत आहे. टीम ईवायव्हीए रविवार २१ मे सकाळी ११:०० वाजल्यापासून मंगळवार २३ मे सकाळी ११ वाजेपर्यंत ४८ तासांसाठी विशेषत: अ‍ॅप आणि eyva.io वर बुकिंग्ज सुरू ठेवेल.

या नवोन्मेष्कारी गॅझेटने ६,००,००० हून अधिक नो-प्रिक आणि नो-ब्लड महत्त्वाच्या रिडिंग्ज स्कॅन केल्या आहेत. भारतातील २८ राज्यांपैकी २६ राज्यांमधील आणि १४१ शहरांमधील ग्राहक लाँच झाल्यापासून ईवायव्हीएचा वापर करत आहेत. या क्रांतिकारी गॅझेटने प्रभावित व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे आणि त्यांना सर्वांगीण जीवनशैली जगण्यास मदत करत आहे.

जगातील पहिले नॉन-इन्वहेसिव्ह जीवनशैली गॅझेट ईवायव्हीए उल्लेखनीय उपलब्धी आहे. हे गॅझेट सेकंदांत कोणतेही टोचणे किंवा वेदनेशिवाय रक्तातील ग्लुएकोज पातळी, रक्तदाब, हार्ट रेट, ईसीजी, ऑक्सिजन पातळी आणि सरासरी ग्लुकोज पातळ्या (HbA1c) या शरीराच्या सहा महत्त्वाच्या घटकांचे मापन करते. ईवायव्हीएची खासियत म्हळणजे त्याच्यामधील नॉन-इन्वेसिव्ह आणि वेदना-मुक्त तंत्रज्ञान. गॅझेटमध्ये मोफत मोबाइल आणि अ‍ॅप्लिकेशन आणि रहस्यमय विश्व अ‍ॅन्थिया रिल्म आहे, जे चित्रपट ‘अवतार’मधील काल्पनिक विश्वामधून प्रेरित आहे, ज्यामुळे आरोग्याप्रती धमाल आणि परस्परसंवादी दृष्टिकोन मिळण्यासह वापरकर्त्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रेरणा मिळते. ईवायव्हीएची डिझाइन मर्सिडीज व्हिजन एव्हीटीआरच्या भावी लुकमधून प्रेरित आहे. हे गॅझेट इतके सुसंगत आहे की, वापरकर्त्याच्या पॉकेट किंवा पर्समध्ये मावू शकते.

ब्लूसेमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक सुनिल मद्दीकतला म्हणाले, ‘आम्हाला ईवायव्हीएच्या मागील बुकिंग्जदरम्यान ग्राहकांनी दिलेल्या अविश्वसनीय प्रतिसादाचा आनंद होत आहे. ईवायव्हीएसाठी तिसरा बुकिंग टप्पा सुरू होण्यासह आम्ही लोकांकडून तोच उत्साह आणि सकारात्मक अभिप्राय मिळण्यास उत्सुक आहोत. मी ईवायव्हीएच्या यशाचे श्रेय आमच्या समर्पित आणि उत्कट टीमने केलेल्या अद्वितीय समर्पिततेला देतो, ज्यांचा व्यक्तींना त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे. आमच्या परस्पर प्रयत्नांनी आम्हाला हे अद्वितीय जीवनशैली गॅझेट सादर करण्यास सक्षम केले, जे अधिक संसाधन उपलब्ध असण्यासह निधी-साह्य मिळालेली कंपनी देखील सादर करू शकली नाही. या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचे अग्रणी म्हणून ईवायव्हीए मेड इन इंडिया उत्पादन आहे, जे व्यक्तींना त्यांच्या जीवनशैलींमध्ये सुधारणा करण्यास सक्षम करत आहे. गेम चेंजर असलेल्या आमच्या क्रांतिकारी गॅझेटने आरोग्यसेवा आणि वेलनेसमध्ये नवीन संधी निर्माण केली आहे.’