ब्लूसेमीकडून फ्लॅश बुकिंग्जची सुरूवात

मुंबई: ब्लूसेमी ही आपल्या प्रमुख ऑफरिंगच्या माध्यमातून व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यामसाठी कटिबद्ध असलेल्या भारतातील आघाडीच्या हेल्थटेक स्टार्टअप त्यांचे क्रांतिकारी ‘मेड इन इंडिया’ उत्पादन ‘ईवायव्हीए’साठी बुकिंगचा दुसरा टप्पा सुरू करत आहे. ईवायव्हीए ११ मार्च २०२३ रोजी त्यांचे अॅप आणि वेबसाइटवर फ्लॅश बुकिंग्जच्या माध्यमातून उपलब्ध असेल.

ईवायव्हीए हे जगातील पहिले नॉन-इन्वेसिव्ह जीवनशैली गॅझेट आहे, जे आपल्या शरीरातील सहा जीवनावश्यक घटकांचे कार्यक्षमपणे निरीक्षण, देखरेख करण्यासोबत एकूण आरोग्य आणि जीवनशैली सुधारू शकते. यामध्ये कोणतेही टोचणे, रक्त व वेदनेशिवाय मिनिटाच्या आत रक्तदाब, हार्ट रेट, ईसीजी, ऑक्सिूजन पातळी, सरासरी ग्लुकोज पातळी (एचबीए१सी) आणि रक्तातील शर्करेच्या पातळ्यांचे सुरक्षितपणे निरीक्षण करता येऊ शकते. उल्लेखनीय बाब म्हणजे या क्रांतिकारी गॅझेटने ३,५०,००० हून अधिक नो प्रिक व नो ब्लड महत्त्वपूर्ण रेकॉर्डिंग्जचे स्कॅन्स पूर्ण केले आहेत.

ईवायव्हीए नॉन-इन्वेसिव्ह आणि वेदना-मुक्त तंत्रज्ञानामुळे वरचढ आहे. या डिवाईसमध्ये मोफत मोबाइल अॅप्लीकेशन आणि गूढ विश्व अॅन्थिया रील्म आहे. जे स्वास्थ्याप्रती अद्वितीय आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन देते आणि वापरकर्त्यांना त्यांची जीवनशैली अपग्रेड करण्यास प्रेरित करते. अॅप वापरकर्त्यांना दैनिक, साप्ताहिक आणि मासिक ट्रेण्ड्ससह त्यांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यास आणि दीर्घकाळापर्यंत आरोग्या,मध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करण्यास सक्षम करते, ज्यामुळे ते त्यांच्या जीवनशैलीवर देखरेख ठेवण्यासोबत सुधारणा करू शकतात. अॅन्थिया रील्ममध्ये तुमच्या महत्त्वपूर्ण घटकांचे निरीक्षण करणे इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप वापरण्याइतकेच सोपे आहे.