मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होळीतील संवेदनशीलपणा…

ठाणे : होळी रंगपंचमीचा आज दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सर्वजण रंगांची मुक्त उधळण करत होते. मुख्यमंत्री शिंदे आपल्या निवासस्थानाकडून टेंभी नाकाकडे जायला निघाले. तेव्हा अचानकपणे घराच्या प्रवेशद्वारावर विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील एक दांपत्य आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला घेऊन पुढे आले. त्यांच्या चिमुकलीला ‘रेटस’ म्हणजेच मुडदूस हा विकार झाल्या असल्याने जसे जसे वय वाढत आहे, तसे तसे मुलीचे हात आणि पाय वाकडे होत आहेत, असे या दाम्पत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले.

आपल्या गाडीतून उतरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाम्पत्यांशी चर्चा केली, या लहान मुलीच्या आई-बाबांना धीर दिला आणि मुंबईतील सर्वोत्तम रुग्णालयात सर्वोत्तम उपचार करण्याचा शब्द दिला. याच ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख असलेल्या मंगेश चिवटे यांना तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावून घेतले आणि संबंधित रुग्णाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश केले. त्या लहान बाळाची आणि त्याच्या आई-बाबांची भेट घालून दिली आणि संबंधित दांपत्याशी चर्चा करून त्यांना सर्वप्रथम सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश संवेदनशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले.