मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रूग्णालयाद्वारे मुंबई रेल्वे पोलिसांना सीपीआर प्रशिक्षण !

मुंबई: सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद मजबूत करण्यासाठी मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रूग्णालयाद्वारे रेल्वे पोलिस आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) प्रशिक्षण कार्यक्रम माझगाव येथील वाडी बंदर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रेल्वे पोलीस आणि कर्मचारी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी रेल्वे आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह ५०पेक्षा अधिक रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

वैद्यकीय आणीबाणीला प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी आणि रेल्वेमधील प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना आवश्यक जीवनरक्षक कौशल्ये सुसज्ज करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. जवळजवळ ५० पेक्षा अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीपीआर तंत्रे वापरण्याची प्रविणता, आत्मविश्वास वाढवण्यासाठी हाताशी सराव आणि सिम्युलेशन व्यायामा केला. सीपीआर ही एक गंभीर आणीबाणीची प्रक्रिया आहे जी हृदयविकाराच्या वेळी आणि इतर वैद्यकीय संकटांच्या दरम्यान जगण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढवू शकते.

रेल्वे आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, ‘आमच्या प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सीपीआरसारख्या जीवनरक्षक कौशल्यांनी सुसज्ज करणे हे त्यांचे सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भभवू शकते आणि सीपीआरमुळे प्रशिक्षित कर्मचार्यांूना जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास सक्षम होईल, संभाव्यत: ते एखाद्याचा जीव वाचवू शकतील. हा उपक्रम आमच्या रेल्वेतील सुरक्षित वातावरण देण्याची बांधिलकी दर्शवितो. वोक्हार्ट हॉस्पिटल्सना त्यांच्या या प्रयत्नातील कौशल्य आणि समर्थनासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.’

मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रूग्णालयाचे इमर्जन्सी मेडिसिन फिजिशियन डॉ. मिहीर शाह यांनी सांगितले, ‘रेल्वे पोलिस आणि गार्डसना सीपीआर प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये देऊन सुसज्ज करत आहोत. वैद्यकीय आणीबाणीच्या काळात त्यांना प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. रेल्वेमध्ये दररोज लाखो प्रवाशांसाठी जीवनरेखा म्हणून काम करतात आणि सीपीआर प्रशिक्षणासह कर्मचाऱ्यांना सक्षम बनवल्याने सर्व प्रवाशांची सुरक्षा वाढते. या महत्त्वाच्या प्रयत्नाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.’