उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते स्तन कर्करोग पडताळणी रुग्णवाहिकेचे उद्घघाटन !

मुंबई:बोरिवली येथील नाना पालकर स्मृति समिती आणि श्री मोरेश्वर सेवा संघातर्फे उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त नाना पालकर स्मृती समितीला कोटक लाइफने दिलेल्या स्तन कर्करोग पडताळणी रुग्णवाहिका (ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग अँबुलन्स) पश्चिम उपनगरातील सेवेचा शुभारंभ संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. अशाप्रकारची स्पर्शविरहीत तपासणी होणारी अद्ययावत एक व्हॅन बंगळुरूला असून दुसरी व्हॅन नाना पालकर स्मृति समितीकडे आहे. रक्षिता या उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना या अद्ययावत व्हॅनद्वारे तपासणीचा लाभ व्हावा, यादृष्टीने नाना पालकर शिबिरांचे आयोजन करणार आहे.

अद्ययावत स्तन कर्करोग पडताळणी रुग्णवाहिका (ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग अँबुलन्स) व्हॅनचे उद्घघाटन केल्यानंतर खासदार गोपाळ शेट्टी यांचे स्मृती चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी नाना पालकर स्मृति समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे, कार्याध्यक्ष डॉ. परेश नवलकर आणि श्री मोरेश्र्वर सेवा संघाचे कार्यवाह प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून या पुढे कॅन्सर पडताळणी व्हॅनमार्फत अधिक गरजू लोकांपर्यंत पोचता येईल,असे समाधान व्यक्त केले. कोटक लाईफ ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग व्हॅनचे उद्घाटन करून त्यातील पहिले शिबिर मंगळवार दिनांक २ मे रोजी एक्सर गावदेवी तलावाजवळ बोरीवली पश्र्चिम करण्यात आले. या कार्यक्रमांत मोठा संख्येने बोरिवलीतील नागरिक आणि नाना पालकर स्मृती समितीचे तसेच श्री मोरेश्वर सेवा संघाचे मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुगंधा देवधर यांनी केले.