होमिओपॅथी उपचारांशी संबंधित हे आहेत गैरसमज – डॉ. मुकेश बत्रा

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी औषध प्रणाली आहे. त्वचा आणि केसांच्या समस्या, श्वसनविषयक समस्या, मानसिक आरोग्य समस्या, कमी रोगप्रतिकारशक्ती, टॉन्सिलिटिस, मायग्रेन, रजोनिवृत्ती, वजन व्यवस्थापन आणि वंध्यत्व यासारख्या विविध आजारांवरील उपचारामधील गुणकारी परिणामांमुळे अनेक देशांमध्ये या पूरक औषध प्रणालीचा सकारात्मकपणे अवलंब केला जातो. भारत २,००,००० नोंदणीकृती होमिओपॅथिक डॉक्टर्स/फिजिशियन्ससह जगामध्ये अग्रस्थानी आहे आणि जवळपास १०० दशलक्ष व्यक्ती उपचारासाठी होमिओपॅथीवर अवलंबून आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी वैद्यकीय प्रणाली असूनही होमिओपॅथीबद्दल अनेक गैरसमज अजूनही अस्तित्वात आहेत. डॉ. बत्रा’ज हेल्थकेअरचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. मुकेश बत्रा यांनी होमिओपॅथी उपचाराबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

गैरसमज १: होमिओपॅथी उपचार संथगतीने काम करते:
होमिओपॅथीने गेल्या काही वर्षांमध्ये तीव्र आजाराच्या उपचारांमध्ये उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत. परिणामी जुलाब, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखे आजार होमिओपॅथिक उपचारांसह त्वरित बरे होत आहेत. संधिवात, दमा, एलर्जी, चिंता आणि नैराश्य यासारख्या दीर्घकालीन आजारांवर उपचार होण्यास वेळ लागतो, कारण या आजारांवर मुळापासून उपचार केले जातात.

गैरसमज २: होमिओपॅथी हा फक्त प्लेसबो इफेक्ट आहे:
हा एक सामान्य गैरसमज आहे, ज्यामधून निदर्शनास येते की होमिओपॅथीचे परिणाम फक्त मानसिक असतात आणि त्यांचा शरीरातील शारीरिक बदलांशी काहीही संबंध नाही. होमिओपॅथीच्या परिणामकारकतेची वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी करण्यासाठी अनेक क्लिनिकल आणि डबल-ब्लाइण्ड तपासण्या करण्यात आल्या आहेत. तसेच होमिओपॅथिक उपचाराने बरे झालेल्या लाखो केसेस वैद्यकीय डेटाद्वारे प्रमाणित केल्या गेल्या आहेत आणि ते त्याच्या वैज्ञानिक परिणामकारकतेचा पुरावा आहेत.

गैरसमज ३: होमिओपॅथी औषधे सुरक्षित नाहीत:
होमिऑपथी हे जगातील सर्वात सुरक्षित औषधोपचारांपैकी एक आहे. याचे कोणतेही घातक किंवा नकारात्मक परिणाम होत नाहीत, कारण ते डायल्यूट केले जाते आणि लहान डोसमध्ये दिले जातात. पण स्वत:हून उपचार सुरू करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होमिओपॅथचा सल्ला घ्यावा.

गैरसमज ४: होमिओपॅथीचा इतर उपचारांसह वापर करता येऊ शकत नाही:
होमिओपॅथीचा वापर इतर उपचारांसोबत करता येतो. होमिओपॅथीकडे येणारे रुग्ण अनेकदा दीर्घकालीन तक्रारी घेऊन येतात आणि ते आधीच इतर प्रकारच्या औषधांचे सेवन करत असतात. ते सेवन करत असलेली काही अॅेलोपॅथिक औषधे अचानक बंद करता येत नाहीत. रासायनिक औषध सेवन करणे थांबवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून, होमिओपॅथीचा अवलंब करत इतर प्रकारचे उपचार हळूहळू थांबवणे उत्तम आहे.

गैरसमज ५: होमिओपॅथिक उपचारांमुळे आहाराबाबत पथ्ये पाळावी लागतात:

होमिओपॅथिक औषधोपचार करताना कोणतीही विशिष्ट आहाराविषयक पथ्ये पाळावील लागत नाही. आजारानुसार आहारविषयक पथ्ये पाहण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांना मीठाचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते आणि मधुमेह असलेल्या रूग्णांना गोड पदार्थ व कर्बोदकांचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते. बहुतांश होमिओपॅथ चांगल्या परिणामकारकतेसाठी होमिओपॅथिक औषधे घेण्यापूर्वी अर्ध्या तासाच्याअंतराची शिफारस करतात.

होमिओपॅथी सुरक्षित, किफायतशीर आणि सहज उपलब्ध असल्याने ही एक औषध प्रणाली आहे, जी आपल्या देशाच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात योग्य आहे.
– डॉ. मुकेश बत्रा
संस्थापक आणि अध्यक्ष
डॉ. बत्रा’ज हेल्थकेअर