आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओसाठी योग्य गोल्ड ईटीएफ कसा निवडावा ? – प्रथमेश माल्या

गोल्ड ईटीएफ हा एक एक्स्चेंज ट्रेडेड फंड आहे आणि तो देशांतर्गत प्रत्यक्ष सोन्याच्या किमतींचा माग ठेवतो. ज्या गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे पण ते साठवून ठेवण्याचा त्रास नको असल्याने प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा नाही, तसेच डिजिटल स्वरूपात सोन्यात गुंतवणूक करण्याचे करविषयक लाभ हवे आहेत अशांसाठी गोल्ड ईटीएफ्स हा आदर्श पर्याय आहे. या साधनांवर प्रीमियम किंवा घडणावळ नसल्यामुळे, गुंतवणूकदारांना या गुंतवणूक पद्धतीचा लाभ मिळतो. याशिवाय, गुंतवणूकदार अगदी १ ग्रॅम एवढ्या कमी प्रमाणातही ईटीएफ खरेदी करू शकतो आणि मग गरजेनुसार ईटीएफ्स जमवत राहू शकतो. आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओसाठी योग्य गोल्ड ईटीएफ कसा निवडावा याबद्दल मार्गदर्शन करत आहेत एंजल वन लिमिटेडचे डीव्हीपी रिसर्च, नॉन-अ‍ॅग्रो कमोडिटीज अँड करन्सी प्रथमेश माल्या.

गुंतवणूकांमध्ये ईटीएफचे मुख्य काम सोन्याच्या किमतींचे प्रतिबिंब दाखवणे हेच आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याच्या अन्य मार्गांच्या तुलनेत गोल्ड ईटीएफ हा मार्ग फायद्याचा आहे. याबद्दल गुंतवणूकदार निश्चिंत राहू शकतो. कारण, यात प्रत्यक्ष बाजारातील सोन्याची किंमत दिसून येते. शिवाय, योग्य गोल्ड ईटीएफ निवडताना गोल्ड ईटीएफमधील खर्चाचे प्रमाण किती आहे हे बघावे लागते. हे प्रमाण जेवढे कमी असेल तेवढे चांगले असते, कारण, गुंतवणूकदार जेव्हा सोन्यातील गुंतवणूक सोडवून घेतो तेव्हा हे खर्च त्याच्या/तिच्या खिशातून कापले जातात.
गोल्ड ईटीएफमधून मिळणारा मोबदला हा लघुकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली लाभाच्या स्वरूपात असतो. दीर्घकालीन लाभावर २० टक्के दराने कर आकारला जातो (सूचीतील लाभांसह), तर गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात जमा होणाऱ्या लघुकालीन लाभांवर कररचनेनुसार कर आकारला जातो.

पूर्वीचा डेटा तपासल्यास तुम्हाला फंडाच्या स्थैर्याविषयी तसेच क्षमतेविषयी कल्पना येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूक करण्यापूर्वी सरासरी किमान ३ वर्षांचा डेटा तपासणे आवश्यक आहे.
मालमत्तेची रोखता (असेट लिक्विडिटी) ही ट्रेडिंगच्या उपक्रमांच्या थेट प्रमाणात असते. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिंगच्या आकारमानानुसार ईटीएफ निवडण्याची गरज भासते. काही जणांना फारशा चढउतारांचा अनुभव येत नाही, तर काही जणांना दर तासाला किमतीतील चढ किंवा उतारांचा अनुभव येतो.

ईटीएफ ट्रेडिंगचा विचार करण्यापूर्वी अंतर्निहित निर्देशांक तपासणे आवश्यक आहे. फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (नेट असेट व्हॅल्यू) आणि सोन्याचे प्रत्यक्ष मूल्य यांतील तफावत ही माग ठेवण्यातील चूक असू शकते. या चुकांमुळे फंड व्यवस्थापनासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते आणि व्यवहारांवरील शुल्क वाढू शकते. त्यामुळे ट्रॅकिंगमध्ये कमीत-कमी चुका असणारे ईटीएफ्सच नेहमी निवडा.

ज्यांना डिजिटल मार्गाने गुंतवणूक करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ईटीएफ हा सोन्यात गुंतवणूक करण्याच्या आदर्श मार्गांपैकी एक आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओच्या गरजा आणि इच्छा यांच्यानुसार गुंतवणूकीचा मार्ग निवडला पाहिजे.

– प्रथमेश माल्या
डीव्हीपी रिसर्च, नॉन-अ‍ॅग्रो कमोडिटीज अँड करन्सी
एंजल वन लिमिटेड