मुंबई: झी मराठी वाहिनीवर येत्या ८ मार्चला ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ प्रसारित होणार आहे. या भव्य सोहळ्याचे प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. कारण झी गौरव पुरस्कारांचं हे २५ वं वर्ष आहे. मनोरंजनाचा हा सोहळा खूप जुन्या आठवणींना उजाळा देणारा असणार आहे. त्याचसोबत नवीन आठवणींचा साठा ही होणार आहे.
या भव्य सोहळ्यात तुम्हासर्वांची लाडकी “पारू” ही पोहचली एका खास परफॉर्मन्ससाठी. या परफॉर्मन्स बद्दल बोलताना पारू म्हणजेच शरयू सोनवणेने स्टेजवरचे काही किस्से उलगडले. ” झी चित्र गौरव पुरस्काराचा हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. हे वर्ष झी चित्र गौरव पुरस्कारचे २५ व वर्ष आहे आणि मला परफॉर्म करण्याची संधी मिळणं खूप मौल्यवान क्षण आहे. माझा पहिला परफॉर्मन्स आणि तो ही श्रेयस तळपदे सरांसोबत त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर होता. मी त्यांचं काम बघत आलेय. मी त्यांना जेव्हा या मंचावर त्यांना तेव्हा थोडं दडपण आले होत. मी शूटनिमित्त साताऱ्यात असल्याने डायरेक्ट टेक्निकलसाठी भेटले आणि आमचा लगेच परफॉर्मेंसही होता. आमचा पेरफार्मन्स झाल्यावर श्रेयस सरांनी मला विचारले “शरयू काय चाललंय तुझं” मी सांगितल पारू करतेय तेव्हा त्यांची रिएक्शन होती ओ पारू.., म्हणजे त्यांचं म्हणणं होत कि त्यांना ही मालिका माहितेय. त्यांच्यापर्यंत ‘पारू’ मालिका पोहचली आहे हे त्यांच्या तोडून ऐकून खूप छान वाटलं. मला त्यांची एक गोष्ट इतकी भारी वाटली की त्यांना माझं नाव एकदा सांगून लक्षातही राहिल आणि त्यांनी माझी विचारपूस ही केली. आमचा डांस होता त्यात बरीच मराठी गाणी होती म्हणजे १९५० पासूनची गाणी आणि माझं गाणं होत “ऐरणीच्या देवा तुला…” माझं आवडतं गाणं आहे हे आणि त्यावर डांस करायला आणि ते ही श्रेयस तळपदेंसोबत ही खूप मोठी गोष्ट होती हा अनुभव मला नेहमी लक्षात राहील”.
बघायला विसरू नका ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ शनिवार ८ मार्च संध्याकाळी ७:००वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.