पुष्पाच्या आवाजात शिवाचा डायलॉग – “केसाला धक्का, कपाळाला बुक्का”

मुंबई: ‘झी चित्र गौरव’ पुरस्काराचं यंदाचं २५ वं वर्ष आहे. तेव्हा यावर्षी प्रेक्षकांसाठी या पुरस्कार सोहळ्यात अनेक सरप्राइजिंग एलेमेंट्स असणार आहेत. याच पुरस्कार सोहळ्यातील एका खास परफॉर्मेंसचा किस्सा आपल्या शिवाने म्हणजेच पूर्वा कौशिकने सांगितला. “झी चित्र गौरव पुरस्कार आपलं २५ वं वर्ष साजरं करत आहे. मला त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली खूप भारी वाटलं. या सोहळ्यात शिवा म्हणून मला डांस करण्याची संधी मिळाली आणि ते ही श्रेयस तळपदे यांच्या सोबत. मी लहान असताना त्यांचा इकबाल सिनेमा पहिला होता आणि त्यासोबत बरेच सिनेमे आणि मालिकाही पहिल्या आहेत. माझ्यासाठी तो मोठा सेलेब्रिटी आहे उत्तम कलाकार आहे. आम्ही २ वेळा टेक्निकल केली आणि मग वन टेक परफॉर्म केलं. एक किस्सा मला सांगायला आवडेल हे तर सर्वाना माहिती आहे की श्रेयसने पुष्पा फिल्मच्या हिंदी व्हर्जन मध्ये आपला आवाज दिला आहे, जेव्हा मी बॅक स्टेज श्रेयसला भेटले तेव्हा मी त्याला शिवा म्हणून एक विनंती केली की शिवाचा एक डायलॉग बोलशील का “केसाला धक्का, कपाळाला बुक्का” आणि त्यांनी पुष्पांच्या आवाजात तो डायलॉग म्हणून दाखवला. जे मला इतकं भारी वाटलं.

२५ वं वर्ष आहे तेव्हा पार्टी तर होणारच! ‘झी चित्र गौरव २०२५’ पुरस्काराच्या अविस्मरणीय क्षणांचे आणि दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार व्हा. ८ मार्चला संध्याकाळी ७:०० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.