मुंबई: मुंबईकरांनो ३१ ऑगस्ट २०२४ ला ‘द स्लीप कंपनी’ (The Sleep Company) (टीएससी) स्टोअर्समध्ये तुमची स्वप्नवत मॅट्रेस मिळवण्यासाठी सज्ज राहा. ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ आधारावर सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत जवळपास एकूण २५ लाख रूपये किंमत असलेल्या १०० मोफत मॅट्रेसेसचे गिव्हअवे आयोजित करण्यात आले आहे. दशकभरासाठी रात्रीच्या वेळी उत्तम झोप मिळण्यासाठी उत्तम मॅट्रेसचा शोध घेत असाल तर कांदिवली, ठाणे, आर सिटी मॉल आणि बांद्रा येथील जवळच्या टीएससी स्टोअरमध्ये जा. ही सुविधा त्यांच्या व्यापक गिव्हअवेचा भाग आहे, जिथे कंपनी मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद अशा प्रमुख शहरांमध्ये जवळपास एकूण १ कोटी रूपये किंमत असलेल्या मॅट्रेसेस मोफत देत आहे.
गिव्हअवेची घोषणा करणारा हा भारतातील पहिला मॅट्रेस ब्रँड आहे आणि त्यामधून भारतीयांना उत्तम झोप मिळण्यास मदत करण्याचा नेतृत्वाचा दृष्टिकोन दिसून येतो. टीएससीने नुकतेच भारतात आपले १००वे स्टोअर लाँच केले आणि या ऑफरसह हा टप्पा साजरा करताना आनंद होत आहे. ही मुंबईकरांसाठी त्यांच्या मॅट्रेसचा अद्वितीय आरामदायीपणा व दर्जाचा अनुभव घेण्याची अद्वितीय संधी आहे.
भारतातील आघाडीचा कम्फर्ट-टेक ब्रँड द स्लीप कंपनी ऑफलाइन रिटेल व्यवसायामध्ये प्रवेश केल्याच्या अवघ्या दोन वर्षांमध्ये १०० सीओसीओ (कंपनी-ओन्ड, कंपनी ऑपरेटेड) स्टोअर्सचा टप्पा गाठणारा सर्वात गतीशील डी२सी ब्रँड आहे. कंपनीने जून २०२२ मध्ये बेंगळुरूमध्ये आपले पहिले स्टोअर लाँच केले.
द स्लीप कंपनीच्या सह-संस्थापक प्रियंका सलोट म्हणाल्या,’आम्हाला व्यक्तींना उत्तम झोप मिळण्यास मदत करण्याच्या आमच्या मिशनअंतर्गत संपूर्ण भारतात ४०० मोफत मॅट्रेसेस देत १००व्या स्टोअर लाँचचा टप्पा साजरा करण्याचा आनंद होत आहे. मुंबईव्यतिरिक्त गिव्हअवे दिल्ली-एनसीआर, चेन्नई आणि हैदराबाद येथे आयोजित करण्यात येईल. पहिल्या टप्प्यामध्ये, आम्ही बेंगळुरूमध्ये अशाच प्रकारचे गिव्हअवे आयोजित केले, ज्यामुळे भारतातील या सर्वात मोठ्या मॅट्रेस गिव्हअवेची किंमत एकूण १.२५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. आम्ही ग्राहकांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी आमच्या विकास प्रवासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि यामधून आमचे त्यांच्यासोबत असलेले दृढ नाते दिसून येते. मुंबईसह प्रमुख मेट्रो शहरांमधील व्यक्तींना त्यांची व्यस्त व धावपळीच्या जीवनशैलींमुळे झोपमोडीचा सामना करावा लागतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा व्यक्तींना आमची पेटण्टेड स्मार्टग्रिड मॅट्रेस घरी घेऊन जाण्याची आणि दशकभर सर्वोत्तम स्लीपिंग अनुभव घेण्याची संधी देण्याचा मनसुबा आहे.’
द स्लीप कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर रिपल चोपडा म्हणाले,’हे गिव्हअवे मुंबईकरांचे त्यांनी दाखवलेला विश्वास आणि निष्ठेसाठी आभार मानण्याची आमची पद्धत आहे आणि आम्ही आगामी वर्षांमध्ये अधिकाधिक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यास उत्सुक आहोत. नाविन्यपूर्ण व पेटण्टेड स्मार्टग्रिड तंत्रज्ञानासह आमची मॅट्रेस व्यक्तींना झोपमोड न होता उत्तम व पुरेशी झोप देते. देशभरातील आमचे ओम्नीचॅनेल विस्तारीकरण ग्राहकांना उच्च दर्जाचा व आनंददायी अनुभव देईल आणि व्यक्तींच्या झोपण्याच्या व सोफ्यावर बसण्याच्या पद्धतीला नव्या उंचीवर घेऊन जाईल.’
द स्लीप कंपनीचे स्टोअर : https://thesleepcompany.in/pages/our-store