उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागात ‘कारगिल विजय दिन’ उत्साहात संपन्न

मुंबई : उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागात ‘कारगिल विजय दिन’ दिनांक २६ जुलै २०२३ ला उत्साहात संपन्न झाला. हा‌ दिवस १९९९ च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या (Indian Army) सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो, हे शाळेचा विद्यार्थी शुभम कोळेकर याने आपल्या खास‌ शैलीत नमूद केले. तसेच कुमार राज कस्तुरे यांनी एका सैनिकाची आत्मकथा सर्वांसमोर उलगडली. शत्रूसैन्यापासून बचाव करण्यासाठी पारंपारिकरित्या चालत आलेल्या लाठीकाठी या खेळाचे देखील प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रसंगी नृत्यकथा या माध्यमातून सादरीकरण करून सैनिकांप्रती आपला आदर व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब मुंबई नॉर्थ आयलँड इनर व्हिल या संस्थेतर्फे रोटरियन पल्लवी चोक्सी, विशेष अतिथी रोटरियन पारुल गांधी, अन्य रोटरीयन तसेच जुहू पोलीस स्टेशनच्या पीएसआय मेघा नरवडे उपस्थित होते.

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांचा आदर आणि आठवण आपण कायम ठेवावी असा संदेश मान्यवरांनी याप्रसंगी दिला.हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष संजीव मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.