लिव्हप्युअरकडून जवळपास ५० टक्के वाढीची नोंद

मुंबई : लिव्हप्युअर या भारतातील होम आणि लिव्हिंग कंझ्युमर उत्पादनांमधील आघाडीच्या ब्रॅण्डने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये जवळपास ५० टक्के वार्षिक वाढीची नोंद केली आहे. वॉटर प्युरिफिकेशन सोल्यूशन सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात साह्यभूत राहिलेली कंपनी आता आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आपली रिटेल उपस्थिती दुप्पट करण्याप्रती कटिबद्ध आहे.

विकासाबाबत घोषणा केल्यानंतर लिव्हप्युअरच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी योजनेमध्ये ब्रॅण्डची रिटेल उपस्थिती वाढवण्याचा, उत्पादन पोर्टफोलिओ विस्तारित करण्याचा, राष्ट्रीय आणि प्रादेशिक एमटी भागीदारांमध्ये भर करण्याचा आणि सर्व डिजिटल व्यासपीठांवर एअर कूलर्सच्या उपलब्धतेची खात्री घेण्याचा मनसुबा आहे. आज लिव्हप्युअरचा ५० टक्के महसूल डिजिटल माध्यमांमधून येतो. कंपनी आता उत्पादन पोर्टफोलिओ, फुली ऑटोमेटेड सेवा पायाभूत सुविधा, अत्याधुनिक उत्पादन केंद्र आणि आरअ‍ॅण्डडी लॅब संदर्भात उत्तमरित्या स्थित आहे.कंपनी आपल्या विकास योजना तयार करत आहे, ज्या त्यांच्या व्यवसायावर केंद्रित आहेत, ज्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये कंपनीच्या विद्यमान आकारामध्ये अडीच पट वाढ होईल.

लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक राकेश कौल म्हणाले, ‘लिव्हप्युअरमध्ये आम्हाला ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान-सक्षम स्मार्ट उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याचा अभिमान वाटतो आणि आर्थिक वर्ष २३ साठी विकास आकडेवारी त्याचे प्रमुख उदाहरण आहेत. आम्ही आता आमच्या वितरणाला अधिक दृढ करण्यास आणि आमचा संपूर्ण पोर्टफोलिओ विविध माध्यमांवर उपलब्ध असण्याची खात्री घेण्यास उत्सुक आहोत. आमचा विश्वास आहे की लिव्हप्युअर पुढील काही वर्षांमध्ये आपला महसूल दुप्पट करू शकते, ज्याचे मोठे श्रेय एकूण जल व्यवसाय आणि स्मार्ट होम विभगामधील विकास संधींना जाऊ शकते.’