महिलांच्या रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक

३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या खेळाडू प्रशिक्षिका मधुरा तांबे हिच्या समवेत रिचा चोरडिया, संयुक्ता काळे,निशिका काळे,किमया काळे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या महिलांनी रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये सोनेरी यश संपादन केले.

या संघास मधुरा तांबे यांचे मार्गदर्शन मिळाले होते. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी २४०.९० गुणांची कमाई केली. जम्मू काश्मीर संघाला रौप्य पदक मिळाले तर हरियाणा संघाला ब्रॉंझ पदक मिळाले.